तुम्ही नवीन वर्षासाठी आज मित्रासोबत पार्टी करण्याचा मूड असेल (party)तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अनेक जण आज गर्दी टाळण्यासाठी घरीच अथवा घराच्या छतावर ओली पार्टी करतात. पण घरी किती दारु पिता येते हा नियम तुम्हाला माहिती आहे का? जर प्रमाणापेक्षा अधिक दारु मागवायची असेल तर अबकारी खात्याची परवानगी घ्यावी लागते हे अनेकांच्या गावीपण नसते. देशातील प्रत्येक राज्यात दारुविषयी वेगवेगळे नियम आहेत. काही राज्यात अबकारी खात्याकडून दारु परवाना घ्यावा लागतो. तर काही ठिकाणी पोलिसांची परवानगी सुद्धा आवश्यक असते. दिल्ली अबकारी कायदा 2009 च्या कलम 33 आणि कलम 58 नुसार या नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड आणि तीन वर्षांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. इतर राज्यात तिथल्या नियमानुसार या दंडाच्या आणि शिक्षेच्या नियमात कमी अधिक फरक आहे. पण कारवाई निश्चित होते.

दिल्ली आबकारी नियम 2010 नुसार, 9 लिटर बिअर अथवा 18 लिटर वाईन घरी(party) मागवायची असेल तर अस्थायी परवाना P-10 वा P-13 घ्यावा लागतो. घरात कमी लोकांमध्ये पार्टी करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. पण जर तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट, एखादा हॉल, सार्वजनिक ठिकाणी अल्कोहल पार्टी करत असाल तर तु्म्हाला कोणत्याही राज्यात अबकारी खाते आणि पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.जर तुम्ही ट्रेनने एका शहरातून दुसर्‍या राज्यात दारु नेण्यास मज्जाव आहे. एक बॉटल दारु सुद्धा नेता येते नाही. रेल्वे कायदा 1989 नुसार, ट्रेन, रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवर दारु पिण्यासही मज्जाव आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. रेल्वे कायदा 1989 च्या 145 नुसार, अशा प्रकरणात सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि 500 रुपयांचा दंड लागतो.

जर तुम्ही बस, कार वा इतर वाहनातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात (party)असाल तर तिथल्या कायद्यानुसार, तुम्हाला दारु नेता येत नाही. दारु पिऊन वाहन चालवता येत नाही. तर बिहार, गुजरात सारख्या राज्यात तर दारुबंदी असल्याने तुम्ही दारु प्यायल्याचे लक्षात आले अथवा दारु सापडली तर मोठी कारवाई होते.विमानात रेल्वे प्रवासानुसार 100 मिलीपर्यंत दारु ठेवता येते. विमान प्रवासात दारुचा विचार करता, देशातंर्गत उड्डाणांमध्ये प्रवाशांना दारु देण्यात येत नाही. मात्र काही विमान कंपन्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात दारु पुरवतात.

हेही वाचा :

मोठी बातमी! LPG वरील सबसिडी बंद होणार? तुमचा

चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा

90 टक्के आयफोन युजर्सना माहिती नाही हे गुप्त फिचर्स,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *