बीडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.(incident)ऊस तोडणीसाठी या मुलींना पराज्यातून आणण्यात आले होते. या मुलींवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार केला. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. यामधील एका मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने घटनेची माहिती पालकांना दिली असता हे प्रकरण उघड झाले. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. (incident)या ठिकाणी छत्तीसगडमधून ऊस तोडीसाठी दोन अल्पवयीन मुलींना आणण्यात आले होते. संधीचा फायदा घेत या मुलींवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार केला. गणेश घाटूळ आणि अशोक पवार अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींची पोलिस चौकशी करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती.(incident) आरोपींनी या मुलींवर बलात्कार केला. यामधील एका मुलीच्या पोटात प्रचंड दुखू लागले. त्रास होऊ लागल्यामुळे तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजलगाव पोलिसांनी दोन्ही (incident)आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिसांनी दोन्ही मुलींना महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे बीडमध्ये संतापाचे वातावरण आहे. ऊसतोड कामगार महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनेमुळे ऊसतोड मजूर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह
हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची