बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका विभक्त महिलेवर पोलिसाने बलात्कार (False)केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली. या पोलिस कर्मचाऱ्याने पीडित महिलेवर पदाचा धाक दाखवत आणि लग्नाचं खोटं आमिष दाखवत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. याप्रकरणी पीडित महिलेने बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली. आरोपी पोलिसाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेने केली.

पीडित महिलेचे लग्न झाले होते पण ती २०२२ पासून नवऱ्यापासून विभक्त राहते. (False)कौटुंबिक वादात आणि कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा आरोपी पोलिसाने घेतला. हा पोलिस विवाहित आहे. तरी देखील त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या पोलिसाने पीडित महिलेला सांगितले होते की, ‘मी पोलिस आहे. त्यामुळे तुला कोर्टाच्या कामात मदत करून लवकर न्याय मिळवून देईन. तसंच त्याने माझं बायकोसोबत पटत नाही आणि मी तिला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेल.’ पोलिसाच्या बोलण्यावर महिलेने विश्वास ठेवला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली. पोलिसाने य महिलेला अनेकदा लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
आरोपी पोलिसाने या महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेले.(False) त्याठिकाणी महिलेला विश्वासात घेऊन मी तुझ्यासोबत लग्न करेल असे म्हणत तिच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. आरोपीने त्यावेळी उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते. त्यामुळे पीडित महिलेला गंभीर शारीरिक इजा झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला तीन टाके पडले होते. याचा खर्च आरोपी पोलिसाने ऑनलाइन पद्धतीने दिला होता.पोलिसाने रुग्णालयाचा खर्च केला होता हाच पुरावा या प्रकरणाचा महत्वाचा पुरावा ठरत आहे. आरोपी पोलिसाने महिलेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ केला.

महिलेने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा त्याने तिला धमकावले. (False)’मी पोलिस आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. तू माझे काहीही बिघडवू शकत नाहीस.’, असे म्हणत आरोपी पोलिस महिलेचा छळ करू लागला.ऐवढेच नाही तर त्याने महिलेसोबतचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलेने केली आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह
हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची