पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या (held) निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी असेल. राज्यात आणखी २० जिल्हा परिषदा आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका दुसर्या टप्प्यात पार पडणार आहेत. पण दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका कधी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे.५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे प्रकरण कोर्टात गेले होते. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळेच २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या आहेक. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वाधिक आहेत. या झेडपीमधील आरक्षणाचा गुंता सुटल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२० जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका (held) दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. त्यातच १० आणि १२वीच्या परिक्षा होणार आहेत. त्याशिवाय शाळेमधील वार्षिक परीक्षाही होणार आहेत. त्यामुळे २० जिल्हा परिषदेच्या या निवडणुका मे अथवा जूनपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
टक्केवारीमध्ये
नंदुरबार – १०० टक्के
पालघर – ९३ टक्के
गडचिरोली- ७८ टक्के
नाशिक- ७१ टक्के
धुळे – ७३ टक्के
अमरावती – ६६ टक्के
चंद्रपूर – ६३ टक्के
यवतमाळ – (held) ५९ टक्के
अकोला – ५८ टक्के
नागपूर – ५७ टक्के
ठाणे – ५७ टक्के
गोंदिया – ५७ टक्के
वाशिम – ५६ टक्के
नांदेड – ५६ टक्के
हिंगोली – ५४ टक्के
वर्धा – ५४ टक्के
जळगाव – ५४ टक्के
भंडारा – ५२ टक्के
लातूर – ५२ टक्के
बुलढाणा – ५२ टक्के
हेही वाचा :
गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात
तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्