दिल्लीच्या मेट्रोमध्ये घडणाऱ्या विचित्र घटना या काही नवीन नाहीत.(metro) कधी कपलचा व्हिडीओ तर कधी भांडणं अशा अनेक गोष्टींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असंच दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोक्यात विचार येईल की, एक नागरिक म्हणून आपण देशाला कसं पुढे नेतोय.हा व्हिडीओ तुम्हाला अत्यंत घाणेरडा वाटू शकतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मेट्रो स्टेशनवर खुलेपणाने लघवी करताना दिसतोय. कोणतंही पब्लिक टॉयलेट नाही तर कोणताही आडोसा नाही…हा व्यक्ती मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अगदी उघड्यावर लघवी करताना कॅमेरात कैद झाला आहे.

यावेळी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ (metro)बनवून तो इंटरनेटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ पाहून स्थानिक लोकं संतापले असून स्वच्छतेच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करतायत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीला हे कृत्य करताना कोणत्याही प्रकारची लाजही वाटली नाही. त्याच्यासाठी ही अगदी एक सामान्य बाब वाटत होती.

या व्हिडीओवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने प्रतिक्रिया दिली आहे. (metro)यामध्ये प्रवाशाांना स्वच्छतेवर लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेट्रो प्रशासनाने म्हटलंय की, डीएमआरसी त्यांच्या सर्व प्रवाशांना परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करण्याची विनंती करतं. जर प्रवाशांना एखाद्या सहप्रवाशाने अशी कोणतीही कृती केल्याचं लक्षात आले तर त्यांनी ते त्वरित डीएमआरसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आणून द्यावी.

हेही वाचा :

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…

झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ

कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *