जगभरात विवाहसंस्थेबाबत विविध परंपरा आणि पद्धती पाहायला मिळतात. (ceremonies) काही विवाह सोहळे त्यांच्या वेगळेपणामुळे चर्चेचा विषय ठरतात. सध्या थायलंडमधील एका अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 37 वर्षांच्या दुआंगदुआन केत्सारो यांनी एकाच मंडपात दोन पुरुषांशी विवाह केला असून या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुआंगदुआन (ceremonies) यांचे पाच वर्षांपूर्वी थायलंडमधील पटाया येथे निवृत्त ऑस्ट्रियन पोलिस अधिकारी रोमन यांच्याशी परिचय झाला होता. काही काळानंतर त्यांची ओळख रोमन यांच्या जवळच्या मित्र मैकी याच्याशी झाली. रोमनसोबत पाच वर्षे आणि मैकीसोबत एक वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर तिघांनी परस्पर संमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा विवाह 28 फेब्रुवारी रोजी थायलंडमधील प्राखोन चाई जिल्ह्यात पारंपरिक थाई पद्धतीने पार पडला.

लग्न समारंभ साधेपणाने पण आनंदाच्या वातावरणात झाला. कुटुंबीय आणि (ceremonies) जवळचे मित्र उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही वर ऑस्ट्रियाचे रहिवासी असून त्यांनी थाई परंपरेनुसार हुंडा म्हणून 10 लाख बात, म्हणजेच अंदाजे 29 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. विवाहानंतर दोघांनी एकत्र तलावात उडी मारून आनंद साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दुआंगदुआन यांच्या आईने (ceremonies) माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुलीने आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. आता ती आनंदी राहावी आणि तिची योग्य काळजी घेतली जावी, हीच आमची इच्छा आहे. दुआंगदुआन यांच्या पहिल्या विवाहातून तीन मुले आहेत. विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलांशी तसेच आई-वडिलांशी मोकळेपणाने चर्चा केली होती.

या अनोख्या विवाहावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत (ceremonies) आहेत. काही जण याकडे आधुनिक आणि परस्पर संमतीवर आधारित नातेसंबंधाचे उदाहरण म्हणून पाहत आहेत, तर काहींनी याला पारंपरिक विवाहसंस्थेला आव्हान देणारी घटना म्हटले आहे. ‘फ्रीडम ऑफ लव्ह’ या संकल्पनेचा उल्लेख करत अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र या विवाहामुळे थायलंडमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही विवाहसंस्थेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *