हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील एका आयटी सल्लागार कंपनीने(company) तब्बल ४०० उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण व हमखास नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या फसवणुकीमुळे शेकडो आयटी कर्मचारी बेकार होण्याच्या मार्गावर असून, आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या नवोदितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कंपनीने उमेदवारांकडून दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये आकारले होते. त्यानंतर पुढील दोन महिन्यांसाठी १५ हजार रुपये मानधन आणि प्रशिक्षणानंतर ३ ते ४ लाख रुपये वार्षिक पगाराचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षण व मानधनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सलग चार महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. अनेक कर्मचारी प्रोजेक्टवर काम करत असूनही वेतन थकल्याचे समोर आले आहे.
याशिवाय, कंपनीचे (company)कार्यालय बहुतेक वेळा बंद असल्याची माहितीही पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट पोलिसांना बोलावल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.दरम्यान, आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरू आहेत. नुकतीच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली होती. त्यामुळे रोजगार कपातीसोबतच अशा फसवणुकीच्या घटना वाढल्याने आयटी क्षेत्रातील रोजगाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

फसवणुकीच्या या प्रकरणात पीडित उमेदवारांनी फोरम फॉर आयटी एम्पलॉइज (एफआयटीई) या संघटनेकडे धाव घेतली आहे. हा प्रकार केवळ कामगार वाद नसून गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे फोरमने स्पष्ट केले आहे. संघटनेने हा मुद्दा कामगार आयुक्तांकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे.पेड प्लेसमेंटच्या जाळ्यात अडकू नका.मोठी रक्कम भरण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, रिव्ह्यू व आर्थिक स्थिती तपासा.पगार न देता कंपनी बंद करणे हा थेट फसवणुकीचा गुन्हा आहे.
दरम्यान, आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरू आहेत. नुकतीच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली होती. त्यामुळे रोजगार कपातीसोबतच अशा फसवणुकीच्या घटना वाढल्याने आयटी क्षेत्रातील रोजगाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या….
निवडणूक रंगणार “बेस्ट” ठरणार “लिटमस पेपर टेस्ट”
ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा!