एकीकडे महिलांवर (women)होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे महिला मोठ्या संख्येने गायब देखील होत आहेत. यामागील नक्की कारण काय असू शकतं… सांगणं कठीण आहे… रोज देशात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे घरात देखील आता महिला सुरक्षित नाहीत. कारण अनेक प्रकरणात नातेवाईकांनीच मुलींवर अत्याचार केले आहेत.

तर विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे आता गुन्ह्यांचं शहर म्हणून ओळखीस येत आहे… गेल्या काही वर्षांत पुण्यात महिला मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. आता देखील 9 दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता झाली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरातून 24 वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव पूजा खंबाट असं आहे. कुणालाही न सांगता ही महिला(women) घरातून बाहेर जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकताच तिची डिलिव्हरी झाली होती.

अवघ्या 9 दिवसांच्या बाळाला सोडून पूजा कुठे गेली असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता पूजाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा हिला 9 दिवसांचं बाळ असून तिचं सी-सेक्शन झालं होतं. पूजाचे टाके देखील काढले नसल्याची माहिती समोर येत आहे.

सांगायचं झालं तर, पुणे शहरात महिला मिसिंग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढला असून या महिलांचा शोध पुणे पोलिसांना लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून (Pune district) 840 महिला गायब झाल्या होत्या.

तर 2024 अल्पवयीन मुलींसह तरुण आणि तरुणीही गायब होत झाल्याने खळबळ उडाली होती. विविध पोलीस ठाण्यात या मिसिंगच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या… अशी देखील माहिती समोर येत आहे.

बेपत्ता होणाऱ्या महिला, मुली या 16 ते 25 च्या वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सतत घरात होत असलेली भांडणं, घरातील रुढी परंपरा, नोकरी करण्याची इच्छा, स्वतःची ओळख निर्माण करण्यची इच्छा असलेल्या मुलींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती पोलिसांनी दिली. तर अनेक प्रकरणांत महिलांचे अपहरणही झाले असल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.

हेही वाचा :

गुटखाबंदी फक्त नावाला; राज्यात उघड्यावर धडाक्यात विक्री

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ! सविस्तर जाणून घ्या

आता घरबसल्या ई-रेशन कार्ड काढता येणार! जाणून घ्या प्रोसेस…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *