इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे. (schedule)आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असून याची लोकप्रियता जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. डिसेंबर 2025 मध्ये IPL 2026 चं मिनी ऑक्शन पार पडलं, त्यानंतर आता स्पर्धा कधी सुरु होणार या संदर्भात चर्चा सुरु असताना 21 जानेवारी रोजी याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार तामिळनाडू, आसाम आणि बंगाल निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की आगामी सीजनचं शेड्युल सुद्धा जाहीर करण्यात येईल. रिपोर्टनुसार आयपीएल सामने खेळवण्यात येणाऱ्या 18 शहरांच्या नावांची घोषणा सुद्धा लवकरच होणार आहे.

आतापर्यंत जे रिपोर्ट समोर आले आहेत त्यानुसार आयपीएल 2026 ची(schedule) सुरुवात 26 मार्च पासून होऊ शकते. तर हा सीजन 21 मे पर्यंत चालेल. बीसीसीआयकडून अद्याप आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाबाबत अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ त्यांचे होम ग्राउंडवरील सामने कुठे खेळणार याविषयी मागील अनेक दिवसांपासून संभ्रम आहे. यापूर्वी आरसीबीचे समाने हे चिन्नास्वामी स्टेडियमवर आणि राजस्थानचे सामने हे जयपुरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होत होते, मात्र यंदा या दोन संघांचे सामने कुठे होणार हे अद्याप स्पष्ट नाही. मंगळवारी आयसीसी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला ज्यात बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 27 जानेवारीपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.
‘या’ 18 शहरांमध्ये होऊ शकतात सामने :
आयपीएल 2026 चे सामने प्रत्यक्ष पाहणं ही अनेकांसाठी एक पर्वणी असते. पुढील सीजनमध्ये सामने कुठे आयोजित केले जाऊ शकतात अशा 18 शहरांची यादी खाली पहा.
- एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु
- अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
- भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी (schedule)इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
- वानखेड़े स्टेडियम, मुंबई
- ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता
- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
- महाराजा यादविंद्र सिंह अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लांपुर
- राजीव गांधी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद
- हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
- डॉ. वाई. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापत्तनम
- बरसापारा क्रिकेट स्टेडियम (असम क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम), गुवाहाटी
- सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर
- महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, पुणे
- शहीद वीर नारायण सिंह अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रायपुर
- जेएससीए अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
- डी वाई पाटिल स्पोर्ट्स स्टेडियम, नवी मुंबई
- ग्रीनफील्ड अंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम
हेही वाचा :
पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद