भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (touch) यांनी केल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काँग्रेसचा दावा योग्य आहे. आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. भाजपचा महापौर बनवण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांना आमचे नगरसेवक आग्रह करीत आहेत. विकास करायचा असेल, निधी आणायचा असेल, तर भाजपबरोबर गेले पाहिजे, अशी काँग्रेस नगरसेवकांची इच्छा आहे. पण ते बंदिस्त असल्याने आता येऊ शकत नाही. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी आमच्याकडे व्यक्त केली. हा संपर्क दूरध्वनीवरून सुरू आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘बहुमत कुणाकडे आहे,(touch) याचा संभ्रम जनतेमध्ये असला तरी विकास केवळ भाजपच करू शकते, यावर लोकांचे एकमत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. मनपा स्वबळावर विकास करू शकेल, अशी स्थिती नाही. त्यासाठी राज्य आणि केंद्राकडून निधी आणावा लागतो. काँग्रेसची सत्ता असलेल्या गावांत आज काय स्थिती आहे, ती एकदा बघा’.’महापौर पदाचे रोस्टर निघाल्यावर स्थिती आणखी स्पष्ट होईल. सर्वांनाच महापौर बनायची इच्छा असल्याने सगळेच सध्या मेहनत घेत आहेत.
महापौर झाला तर तो भाजपचाच होईल, अन्यथा विरोधात बसू, (touch)या मतावर मी ठाम आहे. काँग्रेसचा महापौर झाल्यास विकास होईल का, असा प्रश्न त्यांनी केला.’चंद्रपुरात भाजपची सत्ता यावी, यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न करीत आहोत. बोलण्याची जबाबदारी माझ्याकडे दिल्याने मी यावर बोलतो. मी पुन्हा एकदा सांगतो की, भाजपचा महापौर बनवण्यासाठी आमचे नगरसेवक काँग्रेस नगरसेवकांच्या संपर्कात आहेत, असा टोला त्यांनी वडेट्टीवारांना लगावला.
हेही वाचा :
उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ
कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?