भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी (faces) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. २०२० मध्ये कोरियोग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मासोबत विवाहबंधनात अडकलेल्या चहलचा २०२५ मध्ये घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर चहल आणि धनश्री वेगळे झाले आणि चहलच्या आयुष्यातील पुढील घडामोडींवर चाहत्यांचे लक्ष केंद्रित झाले.

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचे नाव आरजे महावशसोबत जोडले जाऊ लागले. (faces)दोघे अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्याने त्यांच्या डेटिंगच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. मात्र, एका पॉडकास्टमध्ये चहलने या चर्चांना पूर्णविराम देत महावश ही केवळ आपली मैत्रीण असल्याचे स्पष्ट केले होते. कठीण काळात तिने आपल्याला मानसिक आधार दिल्याचेही त्याने सांगितले होते.

आता मात्र या दोघांमधील नात्याबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. (faces)चाहत्यांनी लक्षात आणून दिले आहे की, युजवेंद्र चहल आणि आरजे महावश यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. काही काळापूर्वी एकमेकांसोबत दिसणारे आणि आम्ही चांगले मित्र आहोत असे सांगणारे हे दोघे आता सोशल मीडियावरही एकमेकांपासून दूर झाल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान चहल आणि महावश एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चा अधिकच रंगल्या होत्या. त्या काळात दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता अचानक एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या मैत्रीत नेमकं काय बिनसलं, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. चहलच्या वैयक्तिक आयुष्यातील हा आणखी एक धक्का मानला जात असून, या विषयावर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा :

पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *