विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड तालुक्यातील (declared) सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हिंद दी चादर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश दिला आहे. या कार्यक्रमाला देश विदेशातून हजारो भाविक नांदेडमध्ये येणार असल्याकारणाने भाविकांची सोय, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड (declared)येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाब राज्याचे मुख्यमंत्री
भगवंत मान,यांच्यासह मंत्री या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहेत. (declared)या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ५० एकरवर भव्य मंडप यासाठी उभारण्यात आला आहे. येणाऱ्या भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली असून महाराष्ट्र शासनातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत