कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली (activities) असून गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट या तिन्ही तालुक्यांमध्ये घड्याळ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक बदल होण्याची शक्यता आहे.

या एकत्र येण्याबाबत माजी आमदार राजेश पाटील(activities) आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्यात समझोता झाला असून, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी एकसंघ ताकदीने लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांतील आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती मतदारसंघांत घड्याळ या चिन्हावर उमेदवार उभे राहणार आहेत.
हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत मंत्री हसन मुश्रीफ यांनी (activities)या निर्णयाचे स्वागत केले. चंदगड नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याने त्याचे पडसाद आता जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत उमटताना दिसत आहेत. घड्याळ हे चिन्ह जनतेच्या मनात खोलवर रुजलेले असून, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यापासून या चिन्हाची परंपरा चालत आली आहे, असे डॉ. बाभुळकर यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण अधिक रंगतदार झाले असून, (activities)राष्ट्रवादीची ही एकजूट निवडणुकीत काय परिणाम घडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही आघाडी-युतींची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, येणाऱ्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा :
निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: हातकणंगलेत समर्थकांचा ‘महापूर’, कोल्हापूर-सांगली रस्ता ठप्प!
थेट अमेरिकेत घुसून डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या? इराणच्या डोक्यात नेमका प्लॅन काय
धनश्रीसोबत घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलला वैयक्तिक आयुष्यात आणखी एक मोठा धक्का