कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
शरद पवार यांनी इसवी सन 1999 मध्ये काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.(formed)आणि चार वर्षापूर्वी अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पाडली. त्यांची राष्ट्रवादी सत्तेच्या आणि भाजपच्या वळचणीखाली गेली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर सतत चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही गटात सध्या अस्वस्थता आहे. नजीकच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काही खळबळ उडेल असे वातावरण आहे. आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून स्फोटक विधाने करत आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह 20 ते 22 आमदार भाजपा मध्ये जातील अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील या दोन्ही नेत्यांवर हे सातत्याने बोलत असताना दिसतात. या पार्श्वभूमीवर दोनच दिवसापूर्वी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रोहित पवार यांनी शरद पवार यांनी बोलावलेल्या मुंबईतील बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यातून त्यांनी आपली नाराजी अधिक तीव्रतेने व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी आपल्या गटाच्या आमदार आणि नेत्यांची अगदी अचानकपणे बैठक बोलावल्यामुळे त्याबद्दलही उलट सुलट चर्चा होणे स्वाभाविक आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार काय अशी चर्चा त्यातून सुरू होणे स्वाभाविक आहे. तथापि त्यातून शरद पवारांचे नेमके राजकारण कळत नाही. किंवा ते कळू नये अशीच त्यांची कृती असते आणि वक्तव्य असते. शरद पवार यांचा पक्ष हायजॅक केल्यानंतर अजित दादा पवार यांनी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे.

पण याचवेळी त्यांचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी काहीतरी बिनसले.(formed)अजित दादा पवार यांच्यानंतर पक्षाची सर्व सूत्रे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्याकडे आलेली आहेत. गेले दीड दोन महिन्यात पटेल, तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या कागदपत्रावरून वाद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पटेल आणि तटकरे यांना पवार यांनी तसे बेदखल केले आहे. त्यांच्यावर पक्षाची कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यावरून राष्ट्रवादीमध्ये राजकीय धूसफुस वाढली आहे. आता तर पटेल आणि तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पाडणार अशी लक्षणे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील नुसते 22 आमदारांना घेऊन ते भाजपा मध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामध्ये काही प्रमाणात का होईना तथ्य असल्याचे दिसते. सुनेत्रा पवार यांच्याकडून आपला सन्मान राखला जात नाही. आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, अशी भावना या दोघांची झालेली दिसते. एकूणच अजित दादा पवार यांनी काका शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कदाचित शरद पवार यांच्या मनात सुद्धा तेच असावे किंवा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा फुटावा असे (formed) अभिप्रेत असावे. त्याचाच एक भाग म्हणून रोहित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल स्फोटक विधाने केली जात असावीत असा संशय घ्यायला जागा आहे. पण त्यांनी खळबळजनक विधाने करताना ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे त्या प्रफुल्ल पटेकर आणि सुनील तटकरे यांच्या बद्दल शरद पवार यांनी स्तुती सुमने उधळलेली आहेत. आणि त्याबद्दल नातू हा आजोबावर नाराज आहे. येत्या काही दिवसात सर्वसामान्य जनतेला एखादी खळबळ जनक बातमी ऐकायला मिळेल असे सध्या तरी वातावरण आहे.काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी रोहित पवार यांना आपले राजकीय वारसदार म्हणून राजकारणात लॉन्च केल्याची चर्चा सुरू होती. रोहित पवार यांना आपण शरद पवार यांचे राजकीय वारसदार आहोत असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र शरद पवार यांनी त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाच अधिक महत्त्व द्यायला सुरुवात केली. त्यामुळे शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे हे त्यांच्या खास वर्तुळातील नेत्यांनाही कळून येत नव्हते. आता तर त्यांनी पटेल आणि तटकरे यांचे कौतुक करून रोहित पवार यांच्या पर्यंत त्यांना हवा तो संदेश पोहोचवला आहे असे म्हणता येईल.
हेही वाचा
शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?
पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?
वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला