देशभरातील महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे.(toll) येत्या काही आठवड्यांत टोल भरण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार असून रोख रकमेऐवजी केवळ डिजिटल व्यवहारांना मान्यता दिली जाणार आहे. या बदलामुळे वाहनचालकांनी आधीच तयारी करणे आवश्यक ठरणार आहे.केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार टोल भरण्यासाठी फक्त FASTag किंवा UPI या डिजिटल माध्यमांचाच वापर करता येईल. सध्या काही टोल प्लाझांवर रोख पर्याय उपलब्ध असला तरी तो पूर्णपणे बंद केला जाणार आहे.

या निर्णयाचा परिणाम देशभरातील लाखो वाहनधारक, प्रवासी तसेच (toll) मालवाहतूक क्षेत्रावर होणार आहे. १ एप्रिल २०२६ नंतर कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर रोख पैसे देण्याची मुभा राहणार नाही. त्यामुळे सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीनेच पूर्ण करावे लागतील. सरकारकडून हा बदल देशव्यापी स्तरावर एकाच वेळी लागू केला जाणार आहे. महामार्गांवरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ व्हावी, तसेच टोल नाक्यांवरील रांगा कमी व्हाव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. रोख व्यवहार बंद झाल्याने वेळेची बचत होईल, इंधनाची नासाडी टळेल आणि टोल प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. डिजिटल पद्धतीमुळे गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणेही सोपे होईल, असे सरकारचे मत आहे.
याचबरोबर भविष्यात मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली (toll) लागू करण्यासाठीही हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. या पद्धतीत वाहनांना टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही; सेन्सरच्या सहाय्याने स्वयंचलितरीत्या शुल्क आकारले जाईल. सध्या देशातील सुमारे २५ टोल प्लाझांवर या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे.दरम्यान, वाहनचालकांनी आपला FASTag सक्रिय आहे का आणि त्यात पुरेशी शिल्लक आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. FASTag कार्यरत नसल्यास Google Pay, PhonePe किंवा Paytm यांसारख्या UPI अॅप्सचा पर्याय तयार ठेवावा. अन्यथा १ एप्रिलनंतर रोख रक्कम नाकारली जाईल आणि आवश्यक तयारी नसेल तर दंड किंवा प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार