लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.(account) जानेवारी महिना संपून गेला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता फेब्रुवारी महिनादेखील संपत आला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याचसोबत आता जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.फेब्रुवारी महिना संपायला अवघे ५ दिवस बाकी आहेत. तरीही महिलांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या ५ दिवसात महिलांच्या खात्यात कधीही पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.(account)जानेवारीच्या हप्त्यासाठी आता सामाजिक न्याय खात्यातून निधी वितरित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय खात्याकडून जवळपास ९८ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. याच निधीतून महिलांना जानेवारीचा हप्ता दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरित झाला असला तरीही (account)महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता देणार का, जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र देणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता हप्ता लांबणीवर गेल्याने दोन्ही हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार