गुगलने २०२६ मध्ये आपल्या प्ले स्टोअरला अधिक सुरक्षित (blocked) बनवण्यासाठी जबरदस्त कारवाई केली आहे. कंपनीने १.७५ दशलक्षाहून अधिक बनावट आणि धोकादायक अॅप्स प्रकाशित होण्यापासून रोखले. हे अॅप्स मालवेअरने भरलेले होते जे वापरकर्त्यांचे पैसे चोरू शकतात नकळत सशुल्क सदस्यता सुरू करू शकतात किंवा वैयक्तिक डेटा चोरू शकतात.या कारवाईत गुगलने ८०,००० हून अधिक खराब डेव्हलपर अकाउंट्स कायमचे बंद केले. हे डेव्हलपर्स फसवणूक, घोटाळे आणि नियमांचे उल्लंघन करत होते. आता त्यांना प्ले स्टोअरवर परत येण्याची परवानगी मिळणार नाही. यामुळे भविष्यात असे घोटाळे होण्याची शक्यता खूप कमी झाली आहे.

गुगल प्ले प्रोटेक्ट ही कंपनीची मजबूत सुरक्षा व्यवस्था आता(blocked) दररोज ३५० अब्ज अॅप्स स्कॅन करते. २०२५ मध्ये प्ले स्टोअरबाहेरील २७ दशलक्ष हानिकारक अॅप्स ओळखून ब्लॉक केले. तसेच २.५५ लाख अॅप्सना संवेदनशील डेटा अॅक्सेस करण्यापासून रोखले गेले. हे अॅप्स वापरकर्त्यांच्या फोनवर पोहोचण्यापूर्वीच पकडले गेले!
एआयच्या मदतीने गुगल आता अॅप्सची तपासणी अधिक चांगली करत आहे. अॅप डेव्हलपमेंटच्या सुरुवातीपासूनच मालवेअर, स्पायवेअर किंवा फसवणुकीचे प्रकार शोधले जातात. याशिवाय १६० दशलक्ष बनावट रेटिंग्ज आणि पुनरावलोकने ब्लॉक केली. यामुळे खोट्या हाय रेटिंगमुळे लोक फसत नाहीत. भारतात अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
या मोठ्या अपडेटमुळे भारतीय वापरकर्त्यांना थेट फायदा होईल. (blocked)कमी scam, कमी मालवेअर आणि जास्त सुरक्षित अनुभव मिळेल. गुगल म्हणते ही कारवाई येथेच थांबणार नाही. भविष्यात एआयची सुरक्षा आणखी मजबूत होईल. तुमच्या फोनमध्ये संशयास्पद अॅप असेल तर लगेच डिलीट करा आणि प्ले प्रोटेक्ट चालू ठेवा. गुगलच्या या डिजिटल स्ट्राइकमुळे तुमचा फोन आता जास्त सुरक्षित होणार आहे
हेही वाचा :
जगभरात खळबळ! अमेरिकेला सर्वात मोठा झटका
PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा…