भाविकांनो येत्या काही दिवसांत आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा (temple) मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. येत्या मार्च महिन्याच्या सुरुवातीला ३ मार्च ते ६ मार्च दरम्यान बाळूमामा मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. नऊ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून भाविकांनी त्याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर ता. भुदरगड (temple) इथले सद्गुरू बाळूमामा मंदिर ३ मार्च ते ६ मार्चअखेर दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. नऊ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी मंदिर परिसर, अन्नछत्र, भक्तनिवास, तसेच देणगी विभागात व्यापक स्वच्छता आणि नियोजनबद्ध तयारी हाती घेण्यात येणार आहे.
मंदिर परिसरात दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते.(temple) भंडाऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने व्यवस्थापनाकडून पूर्वतयारीला प्राधान्य देण्यात आले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले , कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी भाविकांनी या कालावधीत मंदिरात येण्याचे टाळावे व सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.उत्सव अधिक सुव्यवस्थित आणि स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. नऊ मार्चपासून मंदिर पुन्हा भक्तांसाठी खुले होणार असून, भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…