राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर (Welfare) शासकीय स्तरावर व्यापक उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. कर्करोगाचे तातडीने निदान व्हावे यासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी पुढाकार घेऊन या तपासण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सध्या कर्करोग तपासणीसाठी राज्यात आठ विशेष वाहने कार्यरत असून ही संख्या वाढवून सर्व जिल्ह्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा सरकारचा मानस आहे. महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीवर विशेष भर देण्यात येत असून आतापर्यंत ३ कोटी २० लाख महिलांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे यासाठी (Welfare) उपाययोजना करण्याबाबत विधानसभेत सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत अमीन पटेल, रईस शेख, बाबासाहेब देशमुख, भास्कर जाधव, राजकुमार बडोले, शेखर निकम, दिलीप लांडे, तमिल सेल्वन, समीर कुणावार, किशोर पाटील, सुलभा खोडके आणि देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या (Welfare) राज्य शासनाच्या धोरणानुसार तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तीन स्तरांमध्ये कर्करोग प्रतिबंध, तपासणी आणि उपचार व्यवस्था मजबूत केली जात आहे. राज्यात २६ ठिकाणी पीपीपी तत्वावर रेडिओथेरपी केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली ९ ते १३ वर्ष वयोगटातील मुलींसाठी तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईत कर्करोग तपासणी व उपचार व्यवस्थेबाबत महापालिका आयुक्तांसोबत विशेष बैठक घेतली जाणार असून कोकणात स्वतंत्र तपासणी केंद्र सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. कर्करोगावरील औषधांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन औषधनिर्मिती कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत कर्करोग रुग्णांसाठी (Welfare) मोफत उपचाराची तरतूद करण्यात आली आहे. किमोथेरपी आणि रेडिएशन उपचारांचा खर्च या योजनांमध्ये समाविष्ट असून पेट स्कॅनची सुविधा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या