कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशभरातील राज्यसभेचे 37 सदस्य निवृत्त होत आहेत (country) आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सात सदस्यांचा समावेश आहे. या जागा भरण्यासाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे.महायुती आणि महाविकास आघाडी कडूनकुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार कि, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार इकडे तमाम महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिले आहे. दि. 2 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेचे 37 खासदार त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाल समाप्त होत असल्याने निवृत्त होणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, फौजीया खान, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, आरपीआय चे रामदास आठवले, भारतीय जनता पक्षाचे भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटील आणि काँग्रेसच्या रजनी पाटील अशी निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांची नावे आहेत. आता गेल्या सहा वर्षात महाराष्ट्राचे राजकारण बदलले आहे आणि नव्याने निवडून जाण्यासाठीचे संख्याबळही बदलले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळ सदस्यांची संख्या लक्षात घेता महायुतीचे सहा उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात इतके त्यांच्याकडे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडे मात्र पूर्वीचे संख्याबळ राहिलेले नाही. आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो.

त्यांच्यासाठी जागा एक आणि दावेदार मात्र तीन आहेत. त्यातून सहमतीचा उमेदवार (country)कोण ठरतो यावर बरेचसे काही अवलंबून आहे.तीन साडेतीन वर्षांपूर्वी शरद पवार यांनी अचानकपणे राजकारणातून आपण अलिप्त होत असल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. जितक्या घाईने त्यांनी हा आपला निर्णय जाहीर केला होता तितक्याच घाईने तो मागेही घेतला होता. आपली राज्यसभेची मुदत अजून तीन वर्षे आहे आणि त्यानंतर मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईन. राज्यसभेची निवडणूक मी पुन्हा लढवणार नाही असे सुद्धा त्यांनी तेव्हा सांगून टाकले होते.आता ते स्वतः राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. निवडणूक पुन्हा लढवणार किंवा नाही याबद्दल त्यांनी काहीही सांगितलेले नाही.आम्ही एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ अशी संदिग्ध प्रतिक्रिया त्यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. या महिन्यात शरद पवार हे दोन वेळा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. प्रकृतीचे कारण सांगून ते राज्यसभेच्या निवडणुकीपासून अलिप्त राहिले तर उबाठा आणि काँग्रेस हे ह्या एका सातव्या जागेवर दावा करू शकतात.

उद्धव ठाकरे गटाकडे वीस आमदार आहेत, आणि म्हणून ते प्रियंका चतुर्वेदी किंवा (country) अन्य कुणासाठी तरी आग्रह धरती. आणि त्याचबरोबर काँग्रेसही आपला दावा मागे घेईल असे दिसत नाही. शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली तर ते महाविकास आघाडीचे सहमतीचे उमेदवार असू शकतात. प्रत्यक्षात मात्र शरद पवार यांचे आजपर्यंतचे राजकारण पाहता ते बोलतात एक आणि कृती मात्र उलटी करतात. त्यांना त्यांच्या वयाचा कोणीही उल्लेख केला तरी तो त्यांना आवडत नाही. अजून मी म्हातारा झालो नाही असे ते मिश्किल पणे सांगत असतात. एकूणच त्यांच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता अगदी जवळच्याना सुद्धा लागत नाही. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गेल्याच आठवड्यात शरद पवार यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावे अशी भूमिका मांडली होती मात्र आदित्य ठाकरे यांनी वेगळा सूर लावताच त्यांनी यु टर्न घेऊन या संदर्भात उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असे सांगून टाकले आहे.

ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जायचे आहे,(country) पण महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता, महाविकास आघाडीच्या सहमतीच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तरच ते शक्य होईल, पण सध्या तरी ती शक्यता धुसरं आहे. सहा वर्षांपूर्वी त्या राहुल गांधी यांच्या वर्तुळातील होत्या. त्यानंतर त्या ठाकरे यांच्याकडे गेल्या, राज्यसभा सदस्य बनल्या. आता त्यांनी एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवला आहे अशी चर्चा आहे. महायुती चे सहा जण राज्यसभेवर सहज जाऊ शकतात. पण भारतीय जनता पक्ष हा सातवी जागा सुद्धा लढवू शकतो. कारण 2022 रोजीच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने धनंजय महाडिक यांना जास्तीचे उमेदवार म्हणून निवडूनही आणले होते. त्या वेळची फडणवीस यांची चाणक्य नीति यंदाही सातवी जागा निवडून आणण्यासाठी वापरली जाईल काय? या प्रश्नाचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेल. शरद पवार यांनी राज्यसभेवर जायचे ठरवले आणि त्यांच्या नावावर एकमत झाले नाही तरमहायुतीकडून त्यांना रसद पुरवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे दहाही आमदार उपस्थित नव्हते.

याचे काही राजकीय अर्थ लावले जातात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील किंवा शरद पवार यांना एनडीए कडे आकर्षित करण्यासाठी भाजपकडूनच त्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी मदत केली जाईल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे शरद पवार यांनी गेल्या तीन वर्षात अनेक वेळा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सांगितले आहे. मात्र ते बोलतात एक आणि करतात वेगळेच हा अनुभव महाराष्ट्राला यापूर्वी अनेक वेळा आला असल्यामुळे
त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते. सहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार राज्यसभेवर गेले होते. आता त्यांचे आमदार सर्वाधिक असल्याने आणखी एक जागा त्यांना मिळणार आहे. भागवत कराड, धैर्यशील पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे नाही. सत्तेच्या बाहेर राहिलेले आणि भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे ठरलेले विनोद तावडे, तसेच 2014 च्या भाजपच्या विजयाचे पडद्यामागील शिल्पकार असलेले पुण्याचे सुनील देवधर हे दोन उमेदवार भाजपचे असू शकतात.

हेही वाचा :

सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश

पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?

‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *