कोल्हापूर येथील शाहू मार्केट यार्डात यंदाच्या हंगामातील पहिल्या रत्नागिरी हापूस (markets) आंबा पेटीचे आज सौदे झाले. यात ६ हजार २१ रुपयांना एक पेटी या भावात पहिली पेटी फळ व्यापारी प्रसाद नंदकुमार वळंजू यांनी खरेदी केला. त्यामुळे रत्नागिरी हापूस आंब्याची यंदाच्या हंगामात उच्चांकी भावात खरेदी झाली.रत्नागिरी येथील बेर्डे बंधू आंबा बागेतून एकूण सहा पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक मार्केट यार्डातील ओंम फ्रुट या अडत दुकानात झाली. त्याचे सौदे झाले यात फळ व्यापारी वळंजू यांनी पहिली पेटी उच्चांकी भावात खरेदी केली. एका पेटीत १५ नग आंबा आहे. नैसर्गिक पिकलेला रत्नागिरी हापूस आंब्याचा गोडवाही उच्चश्रेणीचा मानला जातो. ‘जीआय” मानांकन असलेल्या भौगोलिक वातावरणातील आंबा आहे. त्यामुळे या आंब्याचे भाव दरवर्षी अन्य राज्यातील आंब्यापेक्षा जास्त असतात.

दरवर्षी फेब्रुवारी अखेरला आंब्याची आवक कमी प्रमाणात सुरू झालेली असते,(markets) यंदा मात्र पुरेशा प्रमाणात आंब्याची आवक झालेली नाही. यात यंदा गुढी पाडवा सण लवकर आला आहे. तोपर्यंत बाजारात आंबा पुरेशा प्रमाणात येणे मुश्कील आहे. त्यामुळे भाव तेजीत राहतील, असा अंदाज श्री. वळंजू यांनी वर्तविला आहे.यंदाच्या हंगामाचा विलंब जरी गृहीत धरला तरी एप्रिलनंतर आंबा पूर्ण क्षमतेने बाजारपेठेत येईल, असा अंदाज आहे. कोकणात विशेषतः देवगड, सावंतवाडी, मालवण या भागातील आंबा कोल्हापुरात जास्त प्रमाणात येतो, त्याचभागात खराब हवामानामुळे अद्यापि आंबा पूर्ण वाढ झालेला नाही. त्यामुळे मार्च संपल्यानंतर आंब्याची पूर्ण वाढ तेथे पुढे पाड येणे, आंबा पिकण्यास १५ ती २० दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत काही ठरावीक भागातील जेमतेम आंब्याची आवक होईल. त्यामुळे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा असलेल्या (markets) देवगड हापूस आंबा बाजारात दाखल होत आहे. येथील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमधील व्यापारी बाबा कदम यांच्या स्टॉलवर कुणकेश्वरचा देवगड हापूस आंब्याचा सौदा झाला. आंब्याच्या एक डझनच्या चार पेट्या दाखल झाल्या. सौद्यामध्ये एका पेटीस तब्बल ५ हजार १०० रुपये दर मिळाला.कुणकेश्वर ता. देवगड येथील शेतकरी तुषार शाहीन यांनी आंबे आणले होते. या पेट्यांची खरेदी दलाल कलीम मुनशी यांनी केली. याआधी झालेल्या सौद्यात आंब्याला ६ हजार रुपये एका पेटीस दर मिळाला होता. व्यापारी बाबा कदम म्हणाले, ‘‘यंदा वातावरणातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी आहे. गेल्यावर्षीपेक्षा आता केवळ १५ टक्के उत्पादन आहे. आंब्याला मोहर देखील भरपूर प्रमाणात आला होता; परंतु तो गळून पडल्याने पीक कमी झाले.’’

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *