फेब्रुवारी महिना संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत.(closed)फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा आहे. त्यानंतर मार्च महिना सुरु होईल. मार्च महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो.आर्थिक वर्षा २०२५-२६चा हा शेवटचा महिना असणार आहे. त्यामुळे पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत.पुढच्या महिन्यात ज्यांची बँकेत महत्त्वाची कामे असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. मार्च महिन्यात ११ दिवस बँका बंद असणार आहेत. बँकांच्या सुट्ट्यांची यादी वाचा.

मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
१ मार्च-रविवार देशभरातली सर्व बँका बंद
२ मार्च- होलिका दहनामुळे बँकांना सुट्टी
३ मार्च-धुलिवंदनामुळे बँका बंद
४ मार्च- आगरतळा, अहमदाबाद, ऐझवाल, भुवनेश्वर, चंदीगढ, (closed)देहारादून, इटानगर, जम्मू, कानपूर, नवी दिल्ली, रायपूर येथे होळीमुळे बँका बंद
१३ मार्च- चपचार कुटमुळे ऐझवालमध्ये बँकांना सुट्टी
१७ मार्च-शब-ए कद्रमुळे बँकांना सुट्टी
१९ मार्च-महाराष्ट्र, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, श्रीनगर, नागपूर, पणजी, विजयवाडा येथे गुडी पाडवा, तेलुगु नववर्ष, पहिली नवरात्री असल्याने बँका बंद
२० मार्च- जम्मू, श्रीनगर, कोची, त्रिवेंद्रम येथे ईद-उल-फित्र (रमजान)/जुमात-उल-विदानिमित्त बँकांना सुट्टी
२१ मार्च- रमजान-ईदनिमित्त बँक बंद
२६ मार्च- रावनवमीमुळे अनेक ठिकाणी बँका बंद असणार असणार आहे.
२७ मार्च- भोपाळ, भुवनेश्वर, गंगटोक, पाटणा, हैदराबाद, विजयवाडा येथे रामनवमीमुळे बँकांना सुट्टी
३१ मार्च-अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, जयपूर, कानपूर,(closed)नवी दिल्ली, रांची येथे महावीर जयंतीनिमित्त बँक बंद राहणार आहे.

हेही वाचा :

सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश

पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?

‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *