राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे.(owners) जर नंबरप्लेट बसवली नाही तर वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आता एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांना दंड भरावा लागणार आहे. परिवहन विभाग या वाहनचालकांवर कारवाई करणार आहे.उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत होती. मुदत उलटून दोन महिने झाले तरीही अर्ध्यापेक्षा जास्त वाहनांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. या वाहनांवर कालपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील १ कोटी २ लाख २८ हजार वाहनांनी नोंदणी केली आहे.(owners) त्यापैकी ८८ लाख ३० हजार वाहनांनी नंबरप्लेट बसवली आहे. फक्त ४९ टक्के वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यापैकी ४२ टक्के वाहनधारकांनी प्रत्यक्ष नंबरप्लेट बसवली आहे. अजूनही लाखो वाहनांनी रजिस्ट्रेशन केले आहे. या वाहनांना दंड भरावा लागणार आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुदतीपूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या (owners) वाहनचालकांना नंबरप्लेट बसवण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. या मुदतीनंतर अपॉइंटमेंट घेतलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे.आता ही कारवाई सुरु झाली आहे. वाहनचालकांना १००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केले नाही त्यांनी लवकरात लवकर हे काम करा. अन्यथा तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…