महापालिकेच्या शाळांतील घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय असतानाच (records) समायोजन केलेल्या २४ शाळांच्या पुरातन दस्तऐवजांची झालेली दुरवस्था अधिक गंभीर प्रश्न बनला आहे.एकेकाळी शहराच्या शैक्षणिक वाटचालीची साक्ष देणारे हे अभिलेख आज असुरक्षित आहेत. ते सुरक्षित ठेवण्यासाठी आजच्या डिजिटल युगात दस्तऐवज जतन करण्यासाठी अत्याधुनिक पद्धती उपलब्ध आहेत. त्याचा वापर करणे आवश्यक बनले आहे.संस्थान काळापासून शहरातील महापालिका शाळांनी हजारो विद्यार्थी घडवले. प्रवेश नोंदी, निकालपत्रे, सेवा पुस्तिका, प्रशासकीय आदेश आणि वार्षिक अहवाल यासारखी कागदपत्रे आजही जुन्या रजिस्टरमध्ये जतन आहेत.

सध्या आवश्यक सुविधा नसल्याने अनेक ते झिजत आहेत.(records) यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत त्याचा वापर होणे आवश्यक आहे.दस्तऐवजांचे उच्च दर्जाचे स्कॅनिंग, संगणकीकरण, क्लाउड स्टोरेज आणि डिजिटल बॅकअप यांच्या माध्यमातून अभिलेख कायमस्वरूपी सुरक्षित ठेवता येऊ शकतात. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून शालेय प्रशासन सुलभ करण्यावर भर दिला आहे.या धोरणांच्या अनुषंगाने इचलकरंजीतही कालबद्ध डिजिटलायझेशन मोहीम राबवणे शक्य आहे.
डिजिटल प्रतींची किमान दोन स्वतंत्र ठिकाणी साठवण, नियमित बॅकअप (records) आणि अधिकृत प्रवेश प्रणाली यामुळे अभिलेखांची पारदर्शकता व सुरक्षितता वाढू शकते.केवळ स्कॅनिंग पुरेसे नाही. मूळ दस्तऐवजांसाठी आर्द्रतारोधक, अग्निसुरक्षित आणि हवेशीर ‘रेकॉर्ड रूम’ उभारणे अत्यावश्यक आहे. शास्त्रोक्त वर्गीकरण, सूचीकरण आणि क्रमवारी लावल्यास दस्त ऐवज शोधणे सुलभ होईल.जुन्या कागदपत्रांचे संरक्षण ही प्रशासनिक जबाबदारी नाही. तर सांस्कृतिक कर्तव्य आहे. शाळांचे अभिलेख हे विद्यार्थ्यांच्या कायदेशीर हक्कांशी निगडित असल्याने त्यांचे जतन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञाचे मत आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!