इचलकरंजी शहरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(Extreme) वडिलांना फोनवरून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून तीन मित्रांनी आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी ता. १७ मध्यरात्री दीडच्या सुमारास कृष्णानगरसमोरील महालक्ष्मीनगर येथील निर्जनस्थळी घडली. शाबाज शब्बीर शेख वय २३, रा. शामरावनगर, सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात आसिफ जिल्लाणी यलकुंद्री, सोहेल सनदी दोघे रा. शामरावनगर, सांगली आणि अखिल मुजावर रा. इचलकरंजी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाबाज आणि त्याचे तिन्ही मित्र (Extreme)मध्यरात्री महालक्ष्मीनगर परिसरात गेले होते. यावेळी शाबाजने फोनवरून आसिफ यलकुंद्री यांच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. या घटनेचा राग मनात साचवून तिघांनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यांनी शाबाजला निर्जन ठिकाणी नेऊन प्रथम रुमालाने त्याचा गळा आवळला. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर मोठा दगड उचलून वारंवार प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला. खून केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले.बुधवारी सकाळी कृष्णानगरकडून सोलगे मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील मोकळ्या रानात एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी रक्ताने माखलेला मोठा दगड, चप्पल, रुमाल आणि एक अंगठी सापडली. चेहरा ठेचलेला असल्याने मृताची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक (Extreme)सचिन सूर्यवंशी तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. न्यायवैद्यक पथक आणि ठसेतज्ज्ञांनी पुरावे गोळा केले. श्वान पथकाने घटनास्थळापासून सोलगे मळ्याकडे मार्ग दाखविला. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून छायाचित्रे प्रसारित केली.दुपारनंतर छायाचित्रे पाहून मृताचे मामा आयजीएम रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी शाबाजची ओळख पटवली. त्यानंतर तपासाला वेग आला. नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचा संशय त्याच्या मित्रांवर बळावला. कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

मृत शाबाज हा मूळ शहापूरमधील मलाबादे चौकात राहणारा असला तरी (Extreme)अनेक वर्षांपासून तो सांगली येथे मामाकडे राहत होता. संशयित आसिफ यलकुंद्री याची आत्या इचलकरंजी येथे राहत असल्याने त्याचे येणे-जाणे होते. त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत आसिफने मित्र सोहेल आणि आतेभाऊ अखिल यांना सोबत घेऊन खुनाचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *