येथील भाजी मंडईशेजारी लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या फलकाबाबत (statements)एका महिलेने अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आल्यानंतर रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ महिला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.नागरिकांनी आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चौकात मोठा बंदोबस्त तैनात केला.

चौकात जमलेल्या संतप्त जमावाने इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस (statements)ठाण्याकडे धाव घेत घोषणाबाजी केली व ठिय्या आंदोलन केले. दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात पाचारण केले. संबंधित महिलेवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस उपाध्यक्ष विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलिस निरीक्षक महेश चव्हाण आदींसह मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

तर इचलकरंजी, कबनूर बंद संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून सोमवार (statements)सकाळपर्यंत झेंडे न काढल्यास सोमवारी ता.२३ इचलकरंजी व कबनूर बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे, तर प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.दुपारी हा प्रकार घडल्यानंतर काहींनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र सायंकाळी काही अनोळखी व्यक्तींनी संबंधित महिलेच्या घरावर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकारात एका दुचाकीचे, तसेच घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *