पुणे महानगरपालिकाच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर (greetings) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने या घटनेचा निषेध केला आहे. पक्षाचे वकील अनिल घाटगे यांनी पुण्याच्या महापौर व उपमहापौरांचा निषेध करण्याचा ठराव कोल्हापूर महानगरपालिकामध्ये मंजूर करून तो पुणे महानगरपालिकेला पाठवावा, अशी मागणी केली आहे.

अनिल घाटगे म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या (greetings) सीमाभागातील हजार वस्तीच्या गावातही छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारलेले आहेत. पुण्यात शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता, तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन पुण्यात प्रथम शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि त्यांच्या नावाने मेमोरियल उभारले. त्यामुळे शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घालणे हा कोल्हापूर व बहुजन समाजाचा अपमान आहे.”
दरम्यान, या प्रकरणावर पुण्यात सर्वप्रथम आक्षेप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (greetings) महिला आघाडीकडून घेण्यात आला. महापौरांनी हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण केल्यानंतर शाहू महाराजांना केवळ नमस्कार केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पुणे आणि कोल्हापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, पुढच्या काही दिवसांत यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.पुणे महापालिकेत नवनियुक्त महापौर मंजुषा नागपुरे यांनी पदभार स्वीकारताना डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातला, मात्र बाजूलाच असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घातल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांनी आरोप करत वाद निर्माण केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर टीका झाली असून, शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घालणे हा एक अपमान असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!