केंद्र सरकारने इंधनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.(decision) देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १ एप्रिलपासून केवळ २० टक्के इथेनॉल मिश्रीत आणि 95 IRON पेट्रोल विकणे बंधनकारक असणार आहे. आयात घटवणे आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने थेट परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.95 रिसर्च ऑक्टोन नंबर पेट्रोलला साधारण प्रीमीयम किंवा हाय-ऑक्टोन पेट्रोल संबोधले जाते. ऑक्टोन नंबर जितका जास्त असेल, तितकं इंजिनमध्ये इंधन कमी कार्यक्षमतेने जळते. प्री-इग्निशनचा त्रास कमी होतो. 95 RON पेट्रोलमुळे सुरळीत गाडी चालवता येते.

पेट्रोलियम मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी स्पष्ट केलं आहे की,(decision) पेट्रोलियम कंपन्यांनी भारतीय मानक ब्युरोच्या मानकांनुसार, २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विक्री करावी लागणार आहे. त्यात RON 95 असेल. यामुळे देशभरातील पेट्रोलची गुणवत्ता एकसारखी होणार आहे.सरकारने स्पष्ट केलं आहे की, काही विशिष्ट ठिकाणी सूट देण्यात आली आहे. इथेनॉल हे ऊस, मका या पिकांपासून बनवले जाते. इथेनॉल मिश्रणामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल. यामुळे वाहनाचं उत्सर्जन देखील कमी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२३-२५ साली तयार झालेलं वाहन E20 म्हणजे इथेनॉल मिश्रीत (decision)पेट्रोलच्या अनुषंगाने गाड्या तयार करण्यात आल्या होत्या. या पेट्रोलमुळे नव्या वाहनांना कोणतीही मोठी समस्या होणार नाही.परंतु जुन्या वाहनांचं ३ ते ७ टक्क्यांपर्यंत मायलेज कमी होईल.इंजिनचे नुकसान टाळण्यासाठी 95 RONच्या वापरावर भर दिला जात आहे. इंजिनमध्ये इंधन जळते, त्यावेळी ‘नॉकिंग’ होते. परंतु पिंगिंग सारखा आवाज येतो, त्यावेळी सर्वात जास्त इंजिनचं नुकसान होतं. त्यामुळे RON फायदेशीर ठरते. परंतु पेट्रोलच्या दराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *