Jeffrey Epstein प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर (Jeffrey Epstein case) जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केलेल्या दस्तऐवजांमुळे या प्रकरणाची व्याप्ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून, या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक Bill Gates यांचेही नाव समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी (Jeffrey Epstein case) आपल्या फाउंडेशनमधील कर्मचाऱ्यांसोबत घेतलेल्या टाउन हॉल बैठकीत भूतकाळातील निर्णयांबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की एपस्टाईनसोबत वेळ घालवणे आणि त्याची काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख करून देणे ही गंभीर चूक होती. त्या निर्णयामुळे संस्थेच्या प्रतिमेला धक्का बसला आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, याची त्यांनी कबुली दिली.बैठकीदरम्यान गेट्स यांनी एपस्टाईन फाइल्समध्ये उल्लेख झालेल्या दोन रशियन महिलांशी वैयक्तिक संबंध असल्याचेही मान्य केले. मात्र या संबंधांचा एपस्टाईनच्या गुन्ह्यांशी किंवा पीडितांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मी काहीही बेकायदेशीर केले नाही आणि कोणतेही गैरकृत्य पाहिले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, गेट्स आणि (Jeffrey Epstein case) एपस्टाईन यांच्यातील काही बैठकींचे तपशील आणि छायाचित्रे दस्तऐवजांमध्ये नमूद आहेत. काही फोटोंमध्ये गेट्स महिलांसोबत दिसत असले तरी त्यांची अधिकृत ओळख समोर आलेली नाही.या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. अनेक बड्या उद्योगपती, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची नावे या प्रकरणात समोर येत असल्याने पुढील काळात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेट्स यांनी आपल्या निर्णयांमुळे झालेल्या परिणामांची जबाबदारी स्वीकारत भविष्यात अधिक पारदर्शकतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…