“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…” या सुरेश भट यांच्या ओळी (speak Marathi) आज पुन्हा एकदा प्रत्येक मराठी मनात अभिमानाची भावना जागवतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेची, परंपरेची आणि वैभवशाली साहित्यसंपदेची साक्ष देणारा मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभर उत्साहात साजरा होत आहे.

दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा (speak Marathi) गौरव दिन साजरा केला जातो. हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी, तिचा सन्मान वाढवण्यासाठी आणि साहित्याच्या माध्यमातून समाजमन घडवण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची ही कृतज्ञ आठवण आहे. त्यांच्या साहित्याने मराठीला केवळ अभिव्यक्तीचे माध्यम न ठेवता ती एक विचारधारा, एक चळवळ बनवली.

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर कुसुमाग्रजांच्या (speak Marathi) जन्मदिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा रूढ झाली. राज्यभर या निमित्ताने काव्यवाचन, साहित्य संमेलन, भाषण स्पर्धा, पुरस्कार वितरण सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्था मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा संकल्प याच दिवशी दृढ करतात.

महाराष्ट्र राज्याची (speak Marathi) स्थापना १ मे १९६० रोजी झाली आणि त्याचवेळी मराठीला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली. पुढे १९६५ पासून १ मे हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २७ फेब्रुवारीचा मराठी भाषा गौरव दिन आणि १ मेचा मराठी राजभाषा दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भांनी महत्त्वाचे ठरतात. एक दिवस भाषेच्या साहित्यिक व सांस्कृतिक अभिमानाचा तर दुसरा दिवस तिच्या प्रशासकीय आणि राजकीय मान्यतेचा प्रतीक आहे.

यावर्षीचा मराठी भाषा गौरव दिन अधिक विशेष ठरतो आहे. (speak Marathi) कारण ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे ‘अभिजात भाषा’ अर्थात Classical Language चा दर्जा प्रदान केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठीला हा प्रतिष्ठेचा मान मिळाला. या निर्णयामुळे मराठीच्या प्राचीन परंपरेला, समृद्ध साहित्य वारशाला आणि ऐतिहासिक योगदानाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसाराचा संकल्प करण्याचा आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मराठी अधिक सक्षम, समृद्ध आणि व्यापक व्हावी, हीच प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली ओळख, संस्कृती आणि अभिमान आहे, याची जाणीव आज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *