राज्यातील हवामानात मागील काही दिवसांत मोठे चढउतार पाहायला मिळत (weather) आहेत. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले असतानाच आता उन्हाचा चटका पुन्हा जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभाग यांच्या अंदाजानुसार राज्यातून अवकाळीचे संकट सध्या दूर सरकले असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक पाऊस आणि त्याआधी तीव्र उकाडा अशी विस्कळीत हवामानाची स्थिती यंदा वारंवार अनुभवायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबई आणि परिसरातील हवेच्या गुणवत्तेबाबत (weather) दिलासादायक चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी १७२ पर्यंत पोहोचलेला AQI आता मोठ्या प्रमाणात घसरला आहे. भायखळा आणि दादर परिसरात निर्देशांक ९० ते १२० दरम्यान नोंदवला गेला असून उपनगरांमध्ये तो ५० ते १०० दरम्यान आहे. त्यामुळे हवा ‘मध्यम’ श्रेणीत आली असून आरोग्यावरील धोका तुलनेने कमी झाल्याचे चित्र आहे.

दादर चौपाटी (weather) परिसरात प्रदूषणात झालेल्या घटेमुळे आकाश अधिक स्वच्छ दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वी धूसर दिसणारे आकाश आता ढगांसह स्पष्टपणे दिसत आहे. गावदेवी भागात सर्वात स्वच्छ हवेची नोंद झाली असून वांद्रे पश्चिम, ब्रीच कँडी आणि कुलाबा येथेही समाधानकारक स्थिती आहे. परळ भोईवाडा, चेंबूर, भांडूप पश्चिम आणि बोरीवली पूर्व येथेही AQI ८०च्या आसपास नोंदवला गेला आहे. कालपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी मास्क लावणारे मुंबईकर आता मोकळ्या हवेत फिरताना दिसत आहेत.

महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी घेतलेल्या कारवाईचा परिणाम दिसून येत (weather) आहे. विविध प्रकल्पांना नोटिसा बजावून काही कामे तात्पुरती थांबवण्यात आली होती. त्यानंतर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसते. मात्र ही स्थिती कायम राखण्यासाठी सातत्यपूर्ण उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, देशातील नीचांकी तापमानाची नोंद राजस्थानातील अलवार येथे १० अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान निफाड येथे ११.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. एकीकडे काही भागांत थंडीची चाहूल तर दुसरीकडे उन्हाचा चटका आणि अवकाळी पावसाचे सावट अशा बदलत्या हवामानामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *