देशातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त (announcement) पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असताना आता या संदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी किमान वेतन ठरवण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याची मागणी करत सरकारसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार कुटुंबातील सदस्यांची संख्या तीनवरून थेट पाचपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली असून, हा बदल मान्य झाल्यास किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातव्या वेतन आयोगात किमान वेतन निश्चित करताना (announcement) कर्मचारी, पती किंवा पत्नी आणि दोन मुलं अशा तीन उपभोग युनिट्सचा आधार घेतला गेला होता. त्या वेळी किमान मूळ वेतन १८ हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. मात्र सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत अनेक कर्मचाऱ्यांवर पालकांची जबाबदारीही असते, त्यामुळे कुटुंबाचा विचार पाच सदस्यांपर्यंत केला जावा, अशी कर्मचारी संघटनांची भूमिका आहे. अलीकडील बैठकीत हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला असून वेतन आयोगाला सादर करण्यासाठी संयुक्त निवेदन तयार केले जात आहे.
जर सरकारने कुटुंब (announcement) सदस्यांची संख्या तीनवरून पाचपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मान्य केला, तर वेतन गणनेच्या सूत्रात मोठा बदल होऊ शकतो. तीन ते पाच या प्रमाणात सुमारे ६६ टक्क्यांची वाढ दर्शवली जाते. त्यामुळे सध्या १८ हजार रुपये असलेले किमान मूळ वेतन ५४ हजार रुपयांपर्यंत किंवा काही अंदाजानुसार ५८,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा दावा संघटनांकडून करण्यात येत आहे.
फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. (announcement) सध्या २.५७ असलेला फिटमेंट फॅक्टर किमान ३ ते ३.२५ पर्यंत वाढवण्यात यावा, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्याच नव्हे तर निवृत्त पेन्शनधारकांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल, कारण पेन्शन ही शेवटच्या मूळ पगाराच्या ५० टक्के दराने निश्चित केली जाते.
आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कर्मचारी संघटनांच्या वाढत्या दबावामुळे या विषयाला वेग आला आहे. येत्या काही महिन्यांत या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!