भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या सत्रात पुन्हा (stock market) एकदा अस्थिरतेचे चित्र पाहायला मिळाले. शुक्रवारी, 27 फेब्रुवारी रोजी सकाळच्या व्यवहारातच गुंतवणूकदारांना घसरणीचा धक्का बसला. प्रमुख निर्देशांकांमध्ये सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. BSEचा सेन्सेक्स 28.13 अंकांनी म्हणजेच 0.03 टक्क्यांनी घसरत 82,220.48 या पातळीवर पोहोचला. तर NSEच्या निफ्टी 50 निर्देशांकात 36.70 अंकांची म्हणजेच 0.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 25,459.85 वर उघडला. सकाळी सुमारे 9:24 वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये घसरण अधिकच वाढून तो 253 अंकांनी खाली येत 81,994 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 50 सुमारे 83 अंकांनी घसरून 25,412 वर पोहोचला होता.

या घसरणीच्या वातावरणात आयटी क्षेत्रातील (stock market) काही शेअर्सनी मात्र तुलनेने चांगली कामगिरी केली. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस आणि ट्रेंट यांसारख्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. दुसरीकडे मारुती, इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या शेअर्समध्ये दबाव कायम राहिला.
यापूर्वी गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजीही बाजारात मिश्र चित्र होते. सेन्सेक्स 27.46 अंकांनी (stock market) घसरत 82,248.61 वर बंद झाला होता, तर निफ्टी 50 मध्ये 14.05 अंकांची वाढ होऊन तो 25,496.55 वर स्थिरावला होता. त्या सत्रात अडाणी पोर्ट्स, मारुती, भारती एअरटेल, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे टॉप गेनर ठरले होते, तर ट्रेंट, पावरग्रिड, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्समध्ये घसरण झाली होती.
क्षेत्रनिहाय (stock market) पाहता निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी आणि निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात तेजी दिसून आली होती, तर निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये कमजोरी होती. बीएसई बास्केटमधील 30 पैकी 13 शेअर्स वाढीसह बंद झाले होते, तर 17 शेअर्स घसरणीसह लाल निशाणावर राहिले. एकूणच जागतिक संकेत, नफा-वसुली आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे बाजारात चढ-उतार कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!