ICC Men’s T20 World Cup 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताने झिम्बाब्वेवर (semi-finals) दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 4 गडी गमावत तब्बल 256 धावांचा डोंगर उभारला. विजयासाठी 257 धावांचं आव्हान झिम्बाब्वेसमोर ठेवण्यात आलं, मात्र त्यांना निर्धारित षटकांत 6 बाद 184 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी भारताने हा सामना 72 धावांनी जिंकत आपली ताकद दाखवून दिली.

या पराभवामुळे झिम्बाब्वेचे स्पर्धेतील (semi-finals) आव्हान संपुष्टात आले. साखळी फेरीत दमदार कामगिरी करत त्यांनी प्रथमच सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र या फेरीत त्यांची घोडदौड थांबली. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून मोठा पराभव पत्करल्यानंतर भारताकडूनही त्यांना हार स्वीकारावी लागली. सलग दोन पराभवांमुळे त्यांचा स्पर्धेतील प्रवास इथेच थांबला असला तरी त्यांनी केलेली झुंज उल्लेखनीय ठरली.दरम्यान, भारताच्या या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान जवळपास निश्चित केले होते. भारताच्या विजयामुळे त्यांचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे. त्यामुळे त्यांचा झिम्बाब्वेविरुद्धचा अखेरचा सामना केवळ औपचारिक ठरणार आहे.

आता सर्वांचे लक्ष भारत आणि (semi-finals) वेस्ट इंडिज यांच्यातील निर्णायक लढतीकडे लागले आहे. 1 मार्च रोजी होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा असेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. नेट रनरेटचा कोणताही गुंता नसल्याने सरळ विजयच महत्त्वाचा ठरणार आहे. भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केल्यास त्यांचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के होईल.गुणतालिकेच्या समीकरणानुसार भारत दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता असून उपांत्य फेरीत त्यांचा सामना England किंवा New Zealand यांच्यापैकी एका संघाशी होऊ शकतो. हा महत्त्वाचा सामना मुंबईतील Wankhede Stadium येथे रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धेतील पुढील काही सामने अधिकच रंगतदार ठरणार आहेत.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *