भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज Rinku Singh याच्यावर दु:खाचा (passed away) डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील खाचंद्र सिंग यांचे पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर Yatharth Hospital येथे उपचार सुरू होते. प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने रिंकू काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेण्यासाठी गेला होता. २४ फेब्रुवारी रोजी झालेली ती भेट अखेरची ठरली.

रिंकू सिंग टी-२० सामने खेळत असतानाच त्याला (passed away) वडिलांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक बातमी मिळाली होती. वडिलांची तब्येत बिघडल्याने तो सामना सोडून तातडीने निघाला होता. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे खाचंद्र सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने क्रीडाविश्वात आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अलीगढचा रहिवासी असलेला (passed away) रिंकू अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आला. त्याचे वडील घराघरांत सिलेंडर पोहोचवण्याचे काम करत होते. मुलाचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी अपार कष्ट घेतले. रिंकूने अनेक मुलाखतींमध्ये वडिलांच्या संघर्षाचा उल्लेख केला होता. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने कुटुंबाची परिस्थिती बदलली. काही दिवसांपूर्वीच त्याने वडिलांना एक महागडी कार भेट दिली होती.

दरम्यान, बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे (passed away) फलंदाजी प्रशिक्षक Sitanshu Kotak यांनी रिंकूच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली होती. आता त्यांच्या निधनानंतर रिंकू पुढील टी-२० सामन्यांसाठी उपलब्ध राहणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी सामने संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असताना रिंकूची अनुपस्थिती संघाला जाणवू शकते.काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या रिंकू सिंगसाठी हा वैयक्तिक आयुष्यातील मोठा धक्का आहे. चाहत्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून त्याला सांत्वनाचा वर्षाव होत असून संपूर्ण देश त्याच्या दु:खात सहभागी झाला आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *