राज्यासह देशात सायबर गुन्हेवारी प्रचंड वाढली आहे. सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यामध्येच पुणे पोलिसांना अत्यंत मोठे यश मिळाले असून त्यांनी सायबर गुन्हेगारांचा मुसक्या आवळल्या आहेत.

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. सीबीआय ऑफिसर बोलतोय तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येणार असं सांगून पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 11 कोटींची फसवणूक करण्यात आली. अखेर या चोरट्यांना पकडण्यात सायबर गुन्हे शाखेला यश आले. हर्षद सुभाष धंतोले आणि समर्थ देशमुख या 23 आणि 24 वर्षाच्या दोघांना सायबर पोलिसांकडून अटक केली. हे अत्यंत मोठे यश आहे. (cyber criminals) पुण्यातल्या एका ज्येष्ठ नागरिकाला सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट करण्यात येणार असल्याची भीती दाखवली आणि त्यांचीकडून पावणे अकरा कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही एटीएममधून पैसे काढल्यामुळे पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आल आहे.

आम्ही सीबीआय मधून बोलतोय तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येईल आणि तुमच्या कुटुंबियांनाही अटक करण्यात येईल असं सांगून दोघांनी बँक खात्यात तातडीने रक्कम जमा करण्यास सांगितलं.(cyber criminals) या भीतीपोटी ज्येष्ठ नागरिकांनी 10 कोटी 74 लाख रक्कम या दोघांच्या अकाउंटमध्ये जमा केले. मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

शिवाजीनगरमधील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी दोघांचा तपास सुरू केला. दोघांनी एटीएममधून पैसे काढल्याचे समजतात पोलिसांनी तपासाचा मार्ग बदलला. पोलिसांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची होती. पोलिसांनी तपास केला आणि थेट एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवली.

अखेर दोघांना अटक करण्यात या प्रकरणात यश मिळाले.(cyber criminals) गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. मात्र, शक्यतो सायबर गुन्हेगार लवकर पकडले जात नाहीत. हे पुणे पोलिसांचे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे चॅलेंज सध्या पोलिसांपुढे आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *