T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आता नॉकआऊट स्टेज म्हणजेच सेमी फायनलचे साने होणार आहेत. उद्या भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार असून वानखेडेवर ही मॅच रंगणार आहे. मात्र या मॅचपूर्वीच इंग्लंडच्या खएळाडून वल्गना केल्या असून मोठा इशाराही दिला आहे.

T20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलला आजपासून सुरूवात होणार असून , आज दक्षिण आफ्रिकेचा सामना न्युझीलंडशी होणार आहे. तर उद्या यजमान भारत हा इंग्लंडशी भिडणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला नमवून फायनलमध्ये धडक मारण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल. (T20 World Cup 2026) उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने येतील. मात्र सेमीफायनलमध्ये भारताशी भिडण्यापूर्वीच सामन्यापूर्वी, इंग्लंडच्या खेळाडूने एक मोठं विधान केलंय. स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कॅरनने केलेल्या या विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. वानखेडे स्टेडियम हे उत्साही आणि गोंगाटपूर्ण वातावरणासाठी ओळखले जाते. उपांत्य फेरीत, भारतीय चाहते टीम इंडियाच्या समर्थनार्थ एकच जल्लोष करतील अशी अपेक्षा आहे. पण सॅम करनचा इरादा वेगळाच आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सॅमने मोठं विधान केलं. “हे एक भव्य आणि प्रतिष्ठित स्टेडियम आहे. मला खात्री आहे की गुरुवारी रात्री येथे खूप शांतता असेल. एक तरुण क्रिकेटपटू म्हणून, तुम्ही भारताविरुद्ध विश्वचषक उपांत्य सामना खेळण्याचे स्वप्न पाहता. येथील विकेट सहसा फलंदाजीसाठी चांगल्या असतात आणि मैदान लहान असते, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाईल अशी अपेक्षा आहे” असं म्हणत त्याने भारताला हरवण्याचं एक प्रकारे आव्हान दिलं आहे. 2023 मध्ये वर्ल्डकप फायनलपूर्वी, पॅट कमिन्सने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाखाहून अधिक भारतीय चाहत्यांच्या गर्दीला शांत करण्याबद्दल विधान केलं होतं. (T20 World Cup 2026) अंतिम सामन्यापूर्वी, त्याने प्रेक्षकांना शांत बसवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विराट कोहलीची विकेट घेऊन त्याने इच्छा पूर्ण केली. कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा क्षण म्हणून त्या शांततेचे वर्णन त्याने केलं होतं.
उद्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला एका मजबूत भारतीय संघाचा सामना करावा लागणार आहे. पण सॅम कॅरन दबावाखआली दिसला नाही. आमच्या संघाला भारतीय परिस्थितीत खेळण्याची सवय आहे. (T20 World Cup 2026) संघातील बहुतेक खेळाडूंनी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि आयपीएलमध्येही भाग घेतला आहे असं तो म्हणाला. इंग्लंडला या मोठ्या टप्प्याची भीती वाटत नाही. “आम्हाला एक परिपूर्ण खेळ खेळायचा आहे,” असं तो म्हणाला.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत