अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या निधनानंतर तीव्र झाली होती. शरद पवार गटाकडून एकत्रीकरणाचे दावे केले जात होते, परंतु अजित पवार गटाने मौन बाळगले. आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट, या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुखनेते, अजित पवार यांच्या अकस्मात, अपघाती निधनानंतर तर या विलीनीकरणाच्या चर्चेने खऊपच जोर धरला होता. अजित दादा व शरद पवार गटातील नेत्यांच्या अनेक बैठका झाला, (the Nationalist) दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती, अशी विधान शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जात होत्या. मात्र अजित पवार गटातील नेते, तसेच सुनेत्रा पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले होते. आता याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत आता राष्ट्रवादीच्याच एका मोठ्या नेत्याने अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे.
अजितदादा हयात असताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी हालचाली केल्या, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर या 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा हे राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा करणार होते. विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता, असा दावा शरद पवार गोटातून करण्यात आला होता. मात्र अजित दादांच्या गटातील नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले होते. (the Nationalist) तर आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील कोणीच या विषयावर बोलण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी अद्यापही मौन बाळगलं आहे.
शरद पवार यांच्या गटातून मात्र वेळोवेळी विलीनीकरणाबाबत विधान करण्यात आली होती. मात्र समोरून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा विषय आता मागे पडतो की काय अशा चर्चा सुरू झाल्या. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील वरिष्ठ नेते जयंत पवार यांनी यासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे.
विलनीकरणाची चर्चा आता नाही विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे. (आधी) ज्यांच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, ते नेते (अजित पवार) आता हयात नाहीत. दोन्ही पक्षांचं विलीनीकरण व्हावं, याची सुरवात अजित पवार यांच्याकडून सुरु झाली होती. मात्र आता ते या जगात नाहीत. (the Nationalist) त्यामुळे आत्ता दोन पक्षांचं विलीनीकरण होणार नाही, असं जयंत पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. इतर दोन पक्षांना सुद्धा हे माहिती झालं आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे खळबळ माजली असून विलीनीकरणाला पूर्णविराम मिळाला का, अशी चर्चा सुरू झाली आहे. यापुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत