छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी च्या सहाव्या पर्वात दररोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. वाद, मैत्री, स्पर्धा आणि रोमँटिक अँगल (Bigg Boss Marathi) यामुळे घरातील वातावरण कायमच रंगतदार बनले आहे. यंदाच्या सिझनमध्ये ‘छोटा डॉन’ म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके विशेष चर्चेत आला आहे. त्याच्या बोलण्याची स्टाईल, निरागसपणा आणि अचानक घेतलेले निर्णय यामुळे तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सुरुवातीला प्रभू तन्वीच्या मागे फिरताना दिसत होता. घरातील सदस्य त्याला यावरून चिडवत होते, तर काहीजण त्याच्या भावना खर्‍या आहेत की गेमसाठी आहेत, यावर चर्चा करत होते. मात्र अलीकडील भागात त्याने अचानक सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला. प्रभूने रुचिताला थेट जाऊन सांगितले की ती त्याला आवडते. (Bigg Boss Marathi) त्याच्या या स्पष्ट कबुलीमुळे घरात एकच खळबळ उडाली. नाश्त्याच्या वेळी सर्वजण एकत्र बसले असताना प्रभूने बिग बॉससमोरही आपली भावना व्यक्त केली. तन्वीच्या मागे फिरून आता वैताग आल्याचं सांगत त्याने रुचितासोबत खेळायची इच्छा बोलून दाखवली. रुचिताने त्याला हा गेमचा भाग आहे का अशी विचारणा केली असता प्रभूने लाजतच ती त्याला खरंच आवडते असं सांगितलं. या सगळ्या प्रकारावर राखीनेही मिश्कील टिप्पणी करत वातावरण हलकं केलं.

घरात आधीच अनेक कनेक्शन चर्चेत असताना प्रभू आणि रुचिता यांच्यातील ही नवी जवळीक आता पुढे काय वळण घेते, (Bigg Boss Marathi) याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. प्रभूचा हा निर्णय केवळ स्ट्रॅटेजी आहे की खर्‍या भावना, हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल. मात्र एवढं नक्की की छोटा डॉन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *