भारत हा एकूण गरजेच्या जवळपास 88 टक्के कच्चे तेल आयात करतो. एकूण आयातीमधील अधिकहून वाटा पश्चिम आशियातून येतो. इराणजवळील होमुर्ज समुद्रधुनीतून हा इंधन पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल महागाईची अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. खरंच इंधन महाग होणार?

मध्य-पूर्व देशात तणाव वाढला आहे. इराणविरोधात अमेरिका आणि इस्त्रायलसोबत अरब राष्ट्रांची सहानुभूती दिसून येत आहे. च्या समुद्रधुनीतून इंधनचा पुरवठा करण्यात येतो. या ठिकाणीच सध्या युद्धाचे गडद सावट आहे. इराण कदाचित हा मार्ग बंद करण्याची शक्यता आहे. (West Asia) त्यामुळे जगात इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. वृत्त संस्था भाषा नुसार, भारताकडे सध्या जवळपास 40–45 दिवसांचा इंधनसाठा आहे. ऊर्जा बाजाराची विश्लेषक फर्म च्या विश्लेषणानुसार, भारताकडे जवळपास 10 कोटी बॅरल कच्चा तेलाचा साठा आहे. त्यात रिफायनरी, जमिनीतंर्गत पेट्रोलियम टँक आणि भारताकडे येत असलेल्या जहाजांवरील तेल साठ्याचा समावेश आहे.

भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास 88 टक्के कच्चे तेल आयात करतो. एकूण तेल आयातीतील मोठा वाटा हा पश्चिम आशियातून भारतात येतो. भारत प्रतिदिवशी सरासरी जवळपास 50 लाख बॅरल कच्चे तेल आयात करतो. यामधील जवळपास 25 लाख बॅरल प्रतिदिवशी याच मार्गाने येते. कॅप्लरचे प्रमुख संशोधक आणि विश्लेषक सुमित रितोलिया यांचे म्हणणे आहे की, पश्चिम आशियातून जर पुरवठा साखळी तात्पुरती विस्कळीत झाली तर त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर आणि किंमतीवर दिसून येऊ शकतो. रिफायनरींनी जर तेल साठा असाच टिकून ठेवला आहे. (West Asia) त्यातच जे जहाजं तेल घेऊन निघाली आहेत. ते जर आपत्कालीन परिस्थिती पोहचले तर संकट पुढे ढकलू शकते. पण आयात, इतर खर्च आणि पर्यायी स्त्रोतांकडून खरेदी करणे यामुळे किंमती घसरू शकतात. ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहचली आहे. इराण संकटापूर्वी किंमतीत 10 टक्के वाढ झाली होती.

भारताने गेल्यावर्षी आर्थिक वर्षात कच्चा तेलाच्या आयातीवर 137 अब्ज डॉलर खर्च केले होते. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी या कालावधीत 20.63 कोटी टन कच्च्या तेलाच्या आयातीवर 100.4 अब्ज डॉलर खर्च झाले होते. होर्मुज समुद्रधुनीतून जवळपास 33 किलोमीटर अरुंद मार्ग जातो.(West Asia) हा जलमार्ग फारस आखाताला अरबी समुद्राला मिळतो. जगात समुद्रामार्गे होणार्‍या कच्चा तेलाची निर्यात जवळपास एक तृतीयांश आहे. जागतिक नैसर्गिक वायु पुरवठा जवळपास 20 टक्के इतका आहे. तो याच मार्गाने जातो. गरज पडली तर भारत, पश्चिम अफ्रिका, लॅटिन अमेरिका, अमेरिका आणि रशियाकडून अतिरिक्त तेल खरेदी करून पुरवठा वाढवू शकतो. तज्ज्ञानुसार, भौतिक तुटवड्याऐवजी किंमतीतील अस्थिर आणि आयात बिलात वाढीची भीती असते. पण जर युद्ध लांबले आणि पुरवठा विस्कळीत झाला तर मात्र किंमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *