हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत खूप शुभ मानले जाते.(ekadashi) एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात. हे व्रत भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित आहे. एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या

कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला आजा एकादशीचे(ekadashi) व्रत पाळले जाते. हे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित आहे. ज्यामुळे व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते, असे म्हटले जाते. पंचांगानुसार यंदा आजा एकादशीचे व्रत मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे आणि 20 ऑगस्ट रोजी एकादशीचा उपवास सोडला जाईल. जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर तुम्हाला काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे ठरेल. जाणूनबुजून किंवा नकळत चुकीमुळे तुमचा मोडू शकतो. त्यामुळे तुम्हाला त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही. एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या
या गोष्टींचे करु नका सेवन
तांदळाचे सेवन करु नका
एकादशीच्या दिवशी भात खाणे निषिद्ध मानले जाते. मान्यतेनुसार, या दिवशी भात खाल्ल्यास उपवासाचे फळ मिळत नाही आणि उपवास मोडतो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही स्वरुपात भाताचे सेवन करणे टाळावे.
तामसिक अन्न खाणे टाळा
एकादशीला फक्त सात्विक अन्न खावे. यावेळी लसूण, कांदा, मांस, मद्य आणि इतर तामसिक पदार्थाचे अजिबात सेवन करु नये. उपवासाचे फळ तेव्हाच मिळते ज्यावेळी तुम्ही मनाने आणि शरीराने शुद्ध असता.
इतरांचे वाईट न चिंतणे
उपवास म्हणजे फक्त खाणे-पिणे सोडून न देता मन शुद्ध देखील असायला हवे. एकादशीला कोणाचीही टीका करणे, त्यांच्याबद्दल वाईट बोलणे किंवा खोटे बोलणे टाळावे. मनामध्ये कोणाविषयीही राग किंवा द्वेष मनात बाळगू नका.
केस आणि नखे कापू नये
मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी केस कापणे, नखे कापणे आणि दाढी करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने उपवासाचे फायदे मिळत नाही, असे म्हटले जाते.
तुळशीला हात लावू नये
तुळशीचे रोप भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी या रोपाला हात लावू नये किंवा त्याची पाने देखील तोडू नये. या दिवशी काहीजण निर्जळ व्रत देखील ठेवतात. तुम्हाला हवे असल्यास एकादशीच्या आधीच तुळशीची पाने आणून ठेवावी.
दिवसा झोपू नये
व्रताच्या दिवशी झोपणे अशुभ मानले जाते. या दिवशी शक्य असल्यास ध्यान आणि देवाची पूजा करावी. तसेच जागरण करुन भगवान विष्णूंचे ध्यान करावे.
हेही वाचा :
भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
फक्त भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहेत ‘अशा’ तांदळाच्या प्रजाती; होतील आरोग्यदायी फायदे
या बॉलिवूड अभिनेत्रीकडे आहेत करोडोंच्या 400 लग्जरी बॅग्ज; किंंमत एवढी की त्या विकून मुंबईत आलिशान घर येईल