लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो(devotees) भाविक सहभागी होत असतात आणि राजाचं अंतिम दर्शन घेतात. मात्र दरवर्षी भायखळा येथील हिंदुस्तानी मशिदीसमोर ही भव्य मिरवणूक थांबत असते. यामागे नेमकं काय कारण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हिंदुस्तानी मशि‍दीजवळ का थांबते? ‘हे’ आहे कारण

लालबागचा राजा हा गणपती मुंबईतील सर्वात आकर्षण असलेल्या गणपती आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकही भव्य असते. दरवर्षी जवळपास 24 तास ही विसर्जन मिरवणूक चालते. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होत (devotees) असतात आणि राजाचं अंतिम दर्शन घेतात. मात्र दरवर्षी भायखळा येथील हिंदुस्तानी मशिदीसमोर ही भव्य मिरवणूक थांबत असते. यामागे नेमकं काय कारण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

लालगाबच्या राज्याच्या विसर्जन मिरवणूक हिंदुस्तान मशि‍दीजवळ थांबते. ही केवळ परंपरा नसून ती मुंबईच्या धार्मिक एकतेचे प्रतिक आहे. ही मिरवणूक थांबल्यावर भाविक गणपती बाप्पा मोरया अशी घोषणाबाजी करतात. यावेळी मशिदी समितीचे सदस्य मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी येतात आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतात. हा क्षण आपल्याला धार्मिक आणि सामाजिक ऐक्याची जाणीव करुण देतो. हा क्षण दोन्ही धर्मांना एकत्र आणतो.

ही प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे माहिती नाही, 1980 ते 1990 या कालावधीत स्थानिक मुस्लिम नेत्यांनी विसर्जन मार्गादरम्यान येणारे अडथळे दूर करण्यासाठी या गणेश मंडळाला पाठिंबा दिला होता तेव्हापासून ही प्रथा पाळली जात आहे. आता जेव्हा लालबागचा राजाची मूर्ती विसर्जनाच्या वेळी भायखळा येथील हिंदुस्थानी मशि‍दीजवळ थांबते. (devotees) त्यावेळी स्थानिक मुस्लिम लोक बाप्पाचे फुलांनी स्वागत करतात. तसेच यावेळी मिठाई देखील वाटली जाते.

ही परंपरा एकतेचे प्रतीक आहे. मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक या खास क्षणाची वाट पाहत असतात. मशिदीच्या प्रवेशद्वारांला आशीर्वाद देणारी राजाची मूर्ती आणि मिरवणुकीचे स्वागत करणारी मशिदी हे हिंदू मुस्लिम एकतेचे उदाहरण आहे. ही परंपरा मुंबईतील बंधुत्वाच्या भावनेचे एक प्रतिक आहे. यानंतर ढोल ताशांच्या गजरात लालबागच्या राज्याची मूर्ती चौपाटीकडे रवाना होते.

लालबागच्या राजाच्या विसर्जन मार्ग लालबागच्या राजाची मूर्ती लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन, भायखळा स्टेशन, हिंदुस्तान मशीद, भायखळा भायखळा अग्निशमन दल, नागपाडा चौक (खडा पारसी/एस. मोहनी चौक)गोल देऊळ/दो टाकी क्षेत्र, ऑपेरा हाऊस ब्रिज (सीपी टँक/प्रार्थना समाज/एसव्ही रोड) मार्गे गिरगाव चौपाटी वर पोहोचतेय. या ठिकाणी लालबागच्या राजाला शेवटचा निरोप दिला जातो.

हेही वाचा :

पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार

शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी पोलिसांनी बजावले…

तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *