हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. मान्यता आहे की, (money)ज्या घरात तुळस असते तिथे लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते आणि त्या घरात कधीच धनाची कमतरता जाणवत नाही. तिजोरी नेहमी भरलेली राहते. त्यामुळेच विविध सण-उत्सव आणि व्रतांमध्ये तुळशीची पूजा केली जाते. देवी-देवतांना तुळशीची पानं आणि मंजिरी अर्पण करण्याची परंपरा आहे. दररोज स्नानानंतर तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि कष्ट दूर होतात, असं मानलं जातं.

परंतु वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू तुळशीजवळ ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे, ज्यामुळे घरात (money)गरीबी आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्या वस्तू पुढीलप्रमाणे—
बूट-चप्पल – तुळशीच्या झाडाजवळ पादत्राणं ठेवणं हे तुळशीसह लक्ष्मी मातेचा अपमान मानला जातो. (money)त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. तुळशीचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.
झाडू – भगवान विष्णूंना तुळस प्रिय असल्याने त्यांच्या पूजेसाठी ती अर्पण केली जाते. तुळशीजवळ झाडू ठेवणं हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा अपमान मानलं जातं, ज्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते.
शिवलिंग – तुळशीच्या कुंडीत चुकूनही शिवलिंग ठेवू नये. यामुळे घरात संकटं ओढवू शकतात, अशी मान्यता आहे.
काटेरी झाडं – तुळशीच्या आसपास काटेरी वनस्पती लावल्याने प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते.

कचऱ्याची बादली – तुळशीचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. तिथे कचरा, कचऱ्याचा ढिग किंवा बादली ठेवणं टाळा. असं केल्याने लक्ष्मी मातेची कृपा कमी होते आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.
(सूचना: ही माहिती उपलब्ध धार्मिक आणि वास्तु मान्यतांवर आधारित आहे. याच्या शास्त्रीय सत्यतेबद्दल आमचा दावा नाही, तसेच अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.)
हेही वाचा :
Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!