ॲमेझॉनने आता आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकत एक नवीन हेल्थ असिस्टंट सुरू केला आहे. हा असिस्टंट 30 हून अधिक आजारांवर घरबसल्या प्राथमिक माहिती आणि जलद मार्गदर्शन देतो. वैद्यकीय अहवाल समजून घेणे, डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि लक्षणांवर उत्तरे मिळवण्यासाठी हे साधन मोफत उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य सेवा अधिक सोपी आणि सर्वांसाठी सुलभ बनवेल.

जगभरात वेगाने पसरत असलेल्या एआय तंत्रज्ञानाने आता आरोग्य क्षेत्रातही मोठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. ऑनलाइन शॉपिंगसाठी ओळखली जाणारी कंपनी आता हेल्थकेअरमध्येही नवे प्रयोग करत आहे. कंपनीने आपल्या वेबसाइट आणि अॅपमध्ये हेल्थकेअर असिस्टंट सुरू केला आहे, (Amazon) जो 30 पेक्षा जास्त आजारांबाबत प्राथमिक माहिती आणि मार्गदर्शन देऊ शकणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार हा असिस्टंट वापरकर्त्यांना वैद्यकीय रिपोर्ट समजावून सांगू शकतो, डॉक्टर किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडर्सशी कनेक्ट होण्यास मदत करू शकतो आणि औषधे तसेच लक्षणांबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आलेले हे मॉडेल सुरुवातीला च्या सदस्यांसाठी उपलब्ध असेल.
मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे हा फ्रीअसिस्टंट वापरण्यासाठी प्राइम मेंबरशिप किंवा कोणतीही प्रीमियम सेवा घेणे आवश्यक नाही. त्यामुळे सर्वसामान्य युजर्सही या हेल्थ टूलचा सहज वापर करू शकतील. अँड्र्यू डायमंड यांच्या सांगण्यानुसार, हेल्थकेअरमधील अनेक वेळखाऊ आणि माहितीशी संबंधित कामे हाताळू शकते.(Amazon) त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही खरोखर महत्त्वाच्या उपचारांवर आणि संवादावर अधिक वेळ देता येईल. या उपक्रमामागचा मुख्य उद्देश म्हणजे आरोग्यसेवा अधिक सोपी, जलद आणि सर्वांसाठी उपलब्ध करणे. च्या मदतीने भविष्यात रुग्णांना घरबसल्या अनेक वैद्यकीय शंका दूर करण्याची सुविधा मिळू शकते.
असिस्टंट अनेक नॉन-इमर्जन्सी आजारांबाबत मार्गदर्शन देऊ शकतो. यात मुरुम, डोक्यातील उवा यांसारख्या सामान्य समस्यांपासून ते डायबिटीज आणि झोप नीट लागत नाही सारख्या दीर्घकालीन आजारांपर्यंत विविध स्थितींमध्ये मदत केली जाऊ शकते. हा एजंट लक्षणे कशी नियंत्रित करायची, प्राथमिक वर्च्युअल असेसमेंट कसे करायचे आणि पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन देऊ शकतो. मात्र यासाठी युजर्सना असिस्टंटला आपला वैद्यकीय डेटा अॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागते. या डेटामध्ये लॅब रिपोर्ट्स, वैद्यकीय रेकॉर्ड आणि क्लिनिकल नोट्स यांचा समावेश असू शकतो.
कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की हा असिस्टंट स्वतः उपचार योजना तयार करत नाही. जर रुग्णाची स्थिती गंभीर वाटली किंवा प्रत्यक्ष उपचाराची गरज भासली, तर त्यांना संबंधित हेल्थकेअर प्रोव्हायडरशी जोडतो. (Amazon) तसेच एक महत्त्वाची बाब म्हणजे चे सदस्य नसलेल्या किंवा च्या प्राइमद्वारे दिल्या जाणाऱ्या इंट्रोडक्टरी ऑफरचा फायदा न घेणाऱ्या वापरकर्त्यांकडून सुमारे 29 डॉलर आकारली जाऊ शकते.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर