तुळशीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार या चुकीच्या दिशेने तुळशीचे रोपं लावल्याने नकारात्मक परिणामाचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिशेला रोपं लावणे टाळावे.

तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. हिंदू आध्यात्मिक परंपरेत तुळशीचे खूप विशेष महत्त्व आहे. पुराणांमध्ये असेही म्हटले आहे की तुळशीचे रोप भगवान विष्णूंना प्रिय आहे, आणि (Tulsi) म्हणूनच ज्या घरामध्ये व अंगणात तुळशीचे रोपं असतं त्या ठिकाणी शांती, आनंद आणि समृद्धी येते. शास्त्रांनुसार तुळस ही सकारात्मक उर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र तुळशीचे रोपं तुम्ही जर योग्य दिशेने लावल्यास पूर्ण फायदे मिळतात. अनेक घरांमध्ये तुळशीचे रोपं नकळत चुकीच्या दिशेने लावले जातात, त्यामुळे घरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते, तर चला जाणून घेऊया वास्तूनुसार तुळशीचे रोपं कुठे लावावे आणि कुठे लावू नये…

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वज आणि देवतांची दिशा मानली जाते. या दिशेने तुळशीचे रोप लावणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात.धार्मिक मान्यतेनुसार नैऋत्य दिशेवर राहूचा सर्वात जास्त प्रभाव असल्याचे मानले जाते. (Tulsi) त्यामुळे असे म्हटले जाते की या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि कामात अडथळे निर्माण होतात.

तुळशीच्या रोपांना निरोगी वाढीसाठी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा आवश्यक असते, म्हणून ती अंधाऱ्या खोल्याच्या आसपास, तळघर किंवा मर्यादित सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी लावू नयेत. असे म्हटले जाते की अशा ठिकाणी तुळशीचे रोपं लावल्याने रोपं सुकेल आणि त्यामुळे घरातील वातावरण देखील बिघडेल.पौराणिक कथेनुसार गणपतीच्या पूजे दरम्यान तुळशीचा वापर निषिद्ध आहे, म्हणून तुळस गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा त्याच्या खूप जवळ ठेवू नये. असे मानले जाते की असे केल्याने घरातील समृद्धी कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार तुळस ही एक पवित्र रोपं आहे आणि म्हणूनच तुळशीच्या रोपाच्या आसपास कचरा आणि धूळ नसावा. शिवाय, बूट, चप्पल आणि झाडू यासारख्या वस्तू जवळ ठेवू नयेत. काटेरी झाडे जसे की निवडुंग देखील तुळशीजवळ लावू नयेत.वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला किंवा मध्यभागी ब्रह्मस्थान तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. (Tulsi) असे मानले जाते की ते आर्थिक अडचणी दूर करते आणि संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करते. तसेच घराच्या अंगणात हिरवेगार तुळशीचे रोप लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात प्रेम आणि आनंद वाढतो.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *