उन्हाळा सुरू होताच साप बिळाबाहेर येण्याच्या घटना वाढू लागतात. तापमान (burrows) वाढल्यामुळे जमीन प्रचंड तापते आणि त्या उष्णतेच्या वाफा बिळांमध्ये जातात. साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्याने त्याला जास्त उष्णता सहन होत नाही. त्यामुळे उकाडा वाढला की साप थंड जागेच्या शोधात बाहेर पडतात. अनेकदा ते घरांच्या आसपास, बागांमध्ये किंवा थंड वातावरण असलेल्या ठिकाणी आश्रय घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

घराच्या परिसरात झाडे, झुडपे किंवा दाट (burrows) वनस्पती असतील तर तिथे साप लपण्याची शक्यता अधिक असते. बागकामाची आवड असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बांबू, चंदन किंवा दाट फांद्यांची झाडे असतील तर सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी साफसफाई ठेवणे आणि झाडांच्या भोवती अडगळ जमा होऊ न देणे आवश्यक असते.
भारतात सापांच्या हजारो प्रजाती (burrows) आढळतात, मात्र त्यापैकी काहीच जाती विषारी असतात. घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग या चार प्रमुख विषारी सापांच्या जाती महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे साप दिसल्यास घाबरून त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी त्वरित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधणे हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो.
दरम्यान, काही वनस्पती अशा आहेत ज्यामुळे साप घराच्या परिसरात (burrows) येण्याची शक्यता कमी होते, असेही सांगितले जाते. त्यापैकी सब्जा ही एक आयुर्वेदिक वनस्पती विशेष मानली जाते. आयुर्वेदामध्ये सब्जाच्या बियांचा आणि पानांचा विविध औषधी उपयोग केला जातो. मात्र लोकमान्यतेनुसार ज्या घराच्या परिसरात सब्जाचे झाड लावलेले असते, तिथे साप सहसा येत नाहीत असे मानले जाते. त्यामुळे अनेक जण आपल्या घराच्या अंगणात किंवा बागेत ही वनस्पती लावण्यास प्राधान्य देतात.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय