देशातील मांस बाजारात मोठा बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. (red meat) आतापर्यंत रेड मीट म्हटले की बकरी आणि बोकडाच्या मटणाला सर्वाधिक मागणी असायची. बकरी ईद (ईद-उल-अज्हा) च्या काळात तर कुर्बाणीसाठी बकऱ्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असे. मात्र आता मांस बाजाराचे गणित बदलताना दिसत आहे. बकऱ्यांच्या तुलनेत मेंढ्यांच्या मटणाची मागणी झपाट्याने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

देशात मांसाहारी लोकांमध्ये सर्वाधिक पसंती (red meat) चिकनला असते. कारण ते स्वस्त, सहज उपलब्ध आणि वर्षभर बाजारात मिळते. परंतु गेल्या काही वर्षांत रेड मीटच्या बाजारात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. चवीमुळे आणि खास करून बिर्याणीसाठी योग्य मानले जात असल्याने मेंढ्यांच्या मटणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे अनेक राज्यांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी इतर राज्यांतून मेंढ्यांचे मांस खरेदी करावे लागत आहे.
गेल्या दहा वर्षांत देशात मेंढ्यांच्या मटणाच्या मागणीत (red meat) तब्बल २५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मेंढ्यांच्या पालनालाही मोठी चालना मिळत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारदेखील जलद वाढ होणाऱ्या मेंढ्यांच्या जाती परदेशातून आणण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळते. यामुळे पुढील काळात मेंढ्यांचे उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशातील काही राज्यांमध्ये तर मटणाच्या बाजारात मेंढ्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. मांसामध्ये तुलनेने जास्त चरबी असल्यामुळे त्यापासून बनवलेली बिर्याणी अधिक चवदार लागते, असे या व्यवसायातील लोक सांगतात. त्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्येही मेंढ्यांच्या मटणाचा वापर वाढताना दिसत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार (red meat) २०१४-१५ या वर्षात देशात सुमारे ३.२३ कोटी मेंढ्या कापल्या गेल्या होत्या. तर २०२४-२५ या वर्षात हा आकडा वाढून तब्बल ८.३१ कोटींवर पोहोचला आहे. त्याच काळात बकऱ्यांच्या कत्तलीचा आकडा ८.८१ कोटींवरून १३.४५ कोटींवर गेला आहे. उत्पादनाच्या बाबतीतही मोठी वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये देशात मेंढ्यांच्या मटणाचे उत्पादन सुमारे ४.३१ लाख टन होते, तर २०२४-२५ मध्ये ते वाढून ११.८६ लाख टनांवर पोहोचले आहे.
सध्या देशातील एकूण मटण उत्पादन सुमारे १.०५ कोटी टनांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये चिकनचा (red meat) वाटा सर्वाधिक म्हणजे सुमारे ४९ टक्के आहे. त्यानंतर म्हशींचा वाटा १८.४२ टक्के आहे. बकऱ्यांचे मटण सुमारे १५.०६ टक्के आहे, तर मेंढ्यांचे मटण सुमारे ११.२९ टक्के आहे. मात्र वाढत्या मागणीमुळे पुढील काही वर्षांत या वाट्यात आणखी बदल होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर