भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर Hardik Pandya सध्या वादाच्या (complaint) भोवऱ्यात अडकला आहे. पुण्यात त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. एका वकिलाने पंड्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून त्यासोबत काही व्हिडिओ पुरावेही जोडल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच झालेल्या ICC Men’s T20 World Cup स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने (complaint) न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. कर्णधार Suryakumar Yadav यांच्या नेतृत्वाखाली संघाने हा विजय मिळवला. अंतिम सामना जिंकल्यानंतर मैदानावर भारतीय खेळाडूंनी मोठा जल्लोष केला आणि त्यावेळी अनेक खेळाडूंचे कुटुंबीयही मैदानात उतरून आनंद साजरा करताना दिसले.

या विजयानंतर झालेल्या सेलिब्रेशनदरम्यान (complaint) हार्दिक पंड्याच्या खांद्यावर भारताचा तिरंगा झेंडा होता. याच क्षणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र या व्हिडिओंमध्ये तिरंगा परिधान करून पंड्याने अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत वकील वाजिद खान यांनी पंड्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या मते, राष्ट्रीय ध्वज परिधान करून अशोभनीय कृती केल्याने राष्ट्रीय गौरवाचा अवमान झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात वाजिद खान यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार (complaint) अर्ज सादर केला असून त्यासोबत संबंधित व्हिडिओही जोडले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या मुद्द्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत असून काही जण पंड्याच्या समर्थनात तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *