दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात 3 सामन्यांच्या (Series)टी 20i मालिकेत 1-2 ने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता दोन्ही संघात मंगळवारपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20i मालिकेनंतर 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20i मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली होती. त्यानंतर आता कांगारुंचं एकदिवसीय मालिका जिंकण्याचं लक्ष्य असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका ही मालिका जिंकून टी 20i सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे.(Series) त्यामुळे या एकदिवसीय मालिकेत उभयसंघात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी होणार? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कधी?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना मंगळवारी 19 ऑगस्टला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कॅझलीज स्टेडियम, केर्न्स येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवायला मिळेल.
ऑस्ट्रेलियासमोर 11 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?
ऑस्ट्रेलियाला गेल्या 11 वर्षांपासून द्विपक्षीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदाही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची एकदिवसीय मालिका 2014 साली 4-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर उभयसंघात एकूण 4 एकदिवसीय मालिका खेळवण्यात आल्या. दक्षिण आफ्रिका चारही वेळा सरस ठरली.
दक्षिण आफ्रिका कांगारुंवर वरचढ
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 110 सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या 110 पैकी सर्वाधिक 55 सामने जिंकले आहेत. तर कांगारुंनी 51 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. उभयसंघातील 1 सामन्याचा निकाल लागला नाही. तर 3 सामने टाय झाले. मात्र आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिकाच ऑस्ट्रेलियावर वरचढ असल्याचं सिद्ध होतं.
हेही वाचा :
भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
फक्त भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहेत ‘अशा’ तांदळाच्या प्रजाती; होतील आरोग्यदायी फायदे
या बॉलिवूड अभिनेत्रीकडे आहेत करोडोंच्या 400 लग्जरी बॅग्ज; किंंमत एवढी की त्या विकून मुंबईत आलिशान घर येईल