भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ(pant) पंत सध्या केवळ मैदानावर नव्हे, तर कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे. BCCI चा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, IPLमधील सर्वाधिक सॅलरी आणि ब्रँड अँडोर्समेंट्स या सगळ्यांमधून पंत करोडोंची कमाई करत आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इतकी कमाई असूनही पंत दर महिन्याला 241 लोकांकडून 399 रुपये घेत आहे. यामागचं कारण काहीसं हटके आहे आणि तो सोशल मीडियाशी जोडलेलं आहे.

‘या’ माध्यमातून मिळवतो हजारो
BCCIच्या ‘A’ ग्रेड कॉन्ट्रॅक्टअंतर्गत ऋषभ पंतला (pant)दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात. त्याशिवाय टेस्ट, वनडे आणि टी20 सामन्यांसाठी वेगवेगळी मॅच फीही दिली जाते. टेस्टसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि टी20साठी 3 लाख रुपये. IPLमध्ये पंत सध्या 27 कोटींच्या करारासह सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. जाहिरातींची कमाई वेगळीच आहे.
तरीही 399 रुपयांचं ‘सब्स्क्रिप्शन’ का?
पंत दर महिन्याला 241 लोकांकडून 399 रुपये घेतो. यामागचं कारण आहे इंस्टाग्रामवरील ‘सब्स्क्रिप्शन फीचर’. या फीचरचा वापर करून पंतने इंस्टाग्रामवर ‘सब्स्क्राइबर्स’साठी एक खास क्लोज कम्युनिटी तयार केली आहे, जिथे तो काही खास फोटो आणि व्हिडीओ फक्त त्यांच्यासाठीच शेअर करतो. हे कंटेंट 15 मिलियनहून अधिक सामान्य फॉलोअर्ससाठी उपलब्ध नसतो.
इतकंच नव्हे तर, हे सब्स्क्राइबर्स त्याला थेट प्रश्न विचारू शकतात आणि पंत त्याला खास व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर देतो. यामुळे एक वेगळं आणि खास नातं तयार होतं. अशा 241 सब्स्क्राइबर्समधून दरमहिना सुमारे 96 हजार रुपये पंत कमावतो. टीम इंडियात सध्या असा ‘पेड सब्स्क्रिप्शन’ मॉडेल वापरणारा एकमेव क्रिकेटर म्हणजे ऋषभ पंत आहे.
सध्या क्रिकेटपासून दूर
क्रिकेटच्या मैदानावर ऋषभ पंत सध्या अनुपस्थित आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी दरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला 6 आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. इंग्लंड दौऱ्यात त्याने 479 धावा केल्या होत्या. आता 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज कसोटी मालिकेत त्याची पुनरागमनाची शक्यता आहे.
हेही वाचा :
टी 20I नंतर आता वनडेचा थरार, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा हिशोब करणार?
बिग बॉस 19 च्या स्पर्धकांची यादी समोर? अनेक नावे जाणून नक्कीच धक्का बसेल
एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास